प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे टाकले जात आहेत. पीएम किसान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात २ हजार रुपये टाकले जात असून वर्षाला सरकारकडून शेतकऱ्यांना ६ हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ९ ऑगस्ट रोडी साडेआठ कोटी पेक्षा जास्त लाभार्थ्यांच्या खात्यात डिजिटल माध्यमातून सहावा हप्ता हस्तांतरित करण्यात येत आहे.
दरम्यान आपल्या खात्यात पैसे आले नसतील तर या योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपल्या खात्याविषयी माहिती घेऊ शकतात.
- पेज ओपन झाल्यानंतर पीएम किसान योजनेच्या संकेतस्थळावर 'Farmers Corner' च टॅब दिसेल. या पर्यायामध्ये असलेल्या 'Beneficiary Status' वर ॉ क्लिक करा.
- 'Beneficiary Status'मध्ये आपला आधार नंबर टाका किंवा अकाऊंट नंबर किंवा आपला नोंदणी झालेला मोबाईल नंबर टाका.
- जर आपण आधार नंबर टाकला असेल तर इतर ठिकाणीही आधार नंबर टाका. आणि त्यानंतर 'Get Data' वर क्लिक करा.
- जर खाते क्रमांक टाकला असेल तर इतर ठिकाणीही खाते क्रमांक टाका, आणि 'Get Data' वर क्लिक करा. अशीच प्रक्रिया मोबाईल नंबरबरोबर करा. त्यानंतर आपल्या समोर सर्व हप्त्यांची माहिती प्रदर्शित होईल.
आपल्याला पीएम किसानच्या पोर्टलवर आपले बँक खाते क्रमांकाचे शेवटचे आकडे दिसतील. आणि खात्यात आलेल्या पैशांची माहिती म्हणजेच कधी पैसे खात्यात आले याची माहिती आणि युटीआर नंबर दिसेल. जर पोर्टलवरती आपल्या खात्यात पैसे आल्याचे दिसत असेल पण बँकेकडून मेसेज आला नसेल तर आपण बँकेत याविषयीची चौकशी करावी.
Published on: 19 August 2020, 10:13 IST