News

देशातील करोडो शेतकरी डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून पी एम किसान सन्मान योजनेचा सातवा हप्ता येण्याची वाट पाहत आहेत, परंतु आतापर्यंत खात्यात पैसे जमा झाले नाहीत. परंतु आता लवकरच हा प्रतीक्षा काळ संपणार असून पी एम किसान सन्मान निधी चा सातवा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर ट्रान्सफर केला जाईल याबाबतची माहिती खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली

Updated on 22 December, 2020 5:48 PM IST

देशातील करोडो शेतकरी डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून पी एम किसान सन्मान योजनेचा सातवा हप्ता येण्याची वाट पाहत आहेत, परंतु आतापर्यंत खात्यात पैसे जमा झाले नाहीत. परंतु आता लवकरच हा प्रतीक्षा काळ  संपणार असून पी एम किसान सन्मान निधी चा सातवा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर ट्रान्सफर केला जाईल याबाबतची माहिती खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मध्यप्रदेश मधील महासंमेलन यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी त्यांच्या जन्मदिवशी म्हणजेच 25 डिसेंबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात एम किसान योजना चा सातवा हप्ता ट्रान्सफर करणे सुरू करण्यात येईल.

पी एम किसान योजनेचा सातवा हप्ता आणि या वर्षाचा तिसरा हप्ता डिसेंबरपासून येणार होता. परंतु अजून पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसा पोहोचला नाही. परंतु पंतप्रधानांच्या आत्ताच्या विधानावरून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. जर तुम्ही पीएम किसान सन्मान निधी साठी अर्ज केला असेल, तर तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती घर बसून पाहू शकता. केंद्र  सरकार द्वारा भारतातील लहान शेतकरी जे इन्कम टॅक्स पे करीत नाहीत, अशा शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी सहा हजार रुपयांच्या आर्थिक मदत केली जाते. शेतकऱ्यांनाही आर्थिक मदत वर्षातून तीन टप्प्यांत घेतली जाते. जर तुम्ही पी एम किसान योजनेचे लाभार्थी यादी मध्ये सहभागी आहात, तर तुम्ही तुमचे बँक खाते चेक करू शकता.


हेही वाचा:पी एम किसान सन्मान निधीचा सातवा हप्ता या दिवशी जमा होणार- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माहिती

बँक अकाउंट स्टेटस मध्ये FTO is generated and payment confitmation is pending असे दिसले काय समजायचे की, तुमची कागदपत्रे तपासण्यात  आले आहे आणि लवकरच योजनेचा  सातवा हप्ता तुमच्या खात्यात जमा केला जाईल. याबरोबरच तुमची स्टेटस चेक केल्यानंतर Rft signed by state असं वाक्य दिसू शकत. जर तुम्हाला ही समस्या येत असेल तर गरज नाही घाबरून जाण्याची. Rft चा अर्थ होतो रिक्वेस्ट फॉर ट्रान्सफर म्हणजेच लाभार्थ्याच्या डाटा तपासण्यात आला आहे आणि तुमचे रिक्वेस्ट प्रोसेस साठी ट्रान्सफर केले गेली आहे.

English Summary: The seventh installment of PM Kisan Sanmannidhi will come on December 25
Published on: 22 December 2020, 05:48 IST