गुलटेकडी येथील छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात तरकारी, भाजीपाल्याची किरकोळ विक्री बंद करण्याचा निर्णय कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाने घेतला आहे. यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे.
‘मार्केट यार्डातील फळे भाजीपाला विभागातील गाळे शेतीमालाच्या ठोक व्यवसायासाठी दिले, गाळ्यावर आवक झालेल्या शेतीमालाची दुबार विक्री करू नये, असे परिपत्रक प्रशासनाने काढले आहे.
मार्केट यार्डातील घाऊक बाजारात खरेदीसाठी किरकोळ बाजारातील विक्रेत्यांना बाजार समितीकडे नोंदणी करून परवाना घेणे बंधनकारक आहे. मात्र, मार्केट यार्डात नागरिक मोठ्या संख्येने भाजीपाला, तरकारी, कांदा, बटाट्याच्या किरकोळ खरेदीसाठी येत असतात.
पावसाच्या अंदाज चुकला, राज्यात मोसमी वाऱ्यांचा प्रवास रखडला, २३ जूनपासून सक्रिय होण्याची शक्यता
विशेषत: रविवारी आणि सुटीच्या दिवशी मार्केट यार्डात खरेदीसाठी गर्दी असते. मार्केट यार्डातील गाळ्यांवर किंवा गाळ्यासमोर ‘डमी’ आडत्यांकडून नागरिकांना शेतमालाची विक्री केली जाते. ‘डमी’ आडते परवानाधारक आडत्यांकडून शेतमाल खरेदी करून बाजारातच त्याची विक्री करतात.
या प्रकाराला आता बंदी घालण्यात आल्याने ‘डमी’ आडत्यांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे. बाजार समितीचे सभापती आणि सचिव यांनी हा आदेश काढला आहे.
2 शेतकऱ्यांचा 20 वर्षांचा संघर्ष आला कामी! सावकारीत हडपलेली 9 एकर जमीन मिळाली परत...
मार्केट यार्डातील गाळ्यांसमोरील भागात ‘डमी’ आडत्यांकडून शेतमालाची किरकोळ विक्री केली जाते. त्या पार्श्वभूमीवर फळे भाजीपाला विभागात आलेला शेतीमाल प्रथमतः गाळ्यावर उतरवून घ्यावा.
आयटीमधला जॉब सोडून हे दांपत्य करतंय शेती, शेंगांची पावडर विकून करतात लाखोंची कमाई...
पैसे मिळवून देणारे पीक! लाल-पिवळ्या सिमला मिरचीपासून करा लाखोंची कमाई, जाणून घ्या..
शेतकऱ्यांपेक्षा जास्त कमावणारे मध्यस्थ आहेत, सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश सथाशिवम यांचे वक्तव्य, कृषी जागरणला दिली भेट
Published on: 19 June 2023, 11:38 IST