आंतरराष्ट्रीय बाजारातील साखरेला तेजी, भारतीय साखर उद्योगाला होऊ शकतो फायदा

03 May 2021 11:01 PM By: KJ Maharashtra
आंतरराष्ट्रीय बाजारातील साखरेला तेजी

आंतरराष्ट्रीय बाजारातील साखरेला तेजी

 सध्या जागतिक बाजारात साखरेच्या भावांमध्ये तेजी पाहायला मिळत आहे. त्यामुळे बरीचशी कारणे सांगितली जाता आहेत जसे की,  जगातील ब्राझील हा सगळ्यात जास्त साखर पुरवठादार देश म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखला जातो परंतु ब्राझीलमध्ये साखरेचे उत्पादन कमी होण्याची एक चर्चा आहे कारण ब्राझील मधील जो ऊस उत्पादक पट्टा आहे किंवा प्रदेश आहे अशा ठिकाणी ऊस पिकाच्या वाढीसाठी जमिनीमध्ये जो ओलावा आवश्यक असतो

तो कमी असल्याने ऊस पिका वाढ कमी होण्याचा अंदाज संशोधन संस्था व बहुराष्ट्रीय साखर निर्यातदारांनी वर्तविला आहे.  या दीर्घ कोरडेपणामुळे ब्राझीलचे यंदाच्या हंगामातीलउसाचे गाळप केवळ 530 दशलक्ष टनांपर्यंत पोहोचू शकेल जे मागच्या वर्षी पेक्षा बारा टक्के कमी आणि दहा वर्षातील सर्वात कमी आहे.

 

ह्यामागे दुसरे महत्वाचे कारण म्हणजे जगातील सर्वाधिक साखर उत्पादक असलेल्या फ्रान्समधील बीट पिकाची जवळजवळ दहा टक्के हानी झाली आहे.  त्यामुळे तेथेही साखर उत्पादन कमी होईल असे शेतकरी गट सीजी बी ने म्हटले आहे. या सगळ्या कारण याचा परिणाम हा साखरेच्या दरात आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढ होण्याची स्थिती दर्शवत आहे.  

त्यामुळे अशा कारणांमुळे दर चांगले असल्याचा फायदा हा भारतातून निर्यात होणाऱ्या साखरेला होण्याची शक्यता आहे.  आंतरराष्ट्रीय बाजारातील साखर दराची ही स्थिती पाहताराष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ णे निर्यातीसाठी असलेला कोटा वाढवून देण्याची मागणी केंद्रा कडे केली आहे.

international sugar prices sugar industry साखरेला तेजी भारतीय साखर उद्योग
English Summary: The rise in international sugar prices could benefit the Indian sugar industry

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.