News

नवी दिल्ली: मतदार नोंदणीत महाराष्ट्रातील तरुणांचा पुढाकार उल्लेखनीय असून राज्यातील 11 लाख 99 हजार 527 तरूण मतदार प्रथमच मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

Updated on 19 March, 2019 6:21 PM IST


नवी दिल्ली:
मतदार नोंदणीत महाराष्ट्रातील तरुणांचा पुढाकार उल्लेखनीय असून राज्यातील 11 लाख 99 हजार 527 तरूण मतदार प्रथमच मतदानाचा हक्क बजावणार आहेत. 
केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवरीत ही माहिती पुढे आली आहे. महाराष्ट्रासह देशात होऊ घातलेला लोकशाहीचा सर्वोच्च उत्सव 17 व्या लोकसभेच्या निवडणुकीत सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातील मतदार सज्ज झाले आहेत.

महाराष्ट्रात मतदारांची एकूण संख्या 8 कोटी 73 लाख 29 हजार 910 आहे. राज्यात 18 ते 19 वर्ष वयोगटात अर्थात प्रथमच मतदार म्हणून नोंदणी करणा-या तरूणांची संख्या 11 लाख 99 हजार 527 आहे. हे तरुण प्रथमच लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क बजावणार आहेत. देशात 18 ते 19 वर्ष वयोगटातील मतदारांची एकूण संख्या 1 कोटी 50 लाख 64 हजार 824 आहे. 

मतदार नोंदणीत महिलांचीही आघाडी 4 कोटी 16 लाख महिला मतदार

मतदार नोंदणीमध्ये राज्यात महिला मतदारही आघाडीवर आहेत. राज्यातील पुरुष व महिला मतदारांचे प्रमाण एक हजार पुरुष नोंदणीकृत मतदारामागे नोंदणीकृत 911 महिला मतदार असे आहे. राज्यात एकूण 8 कोटी 73 लाख 29 हजार 910 नोंदणीकृत मतदार आहेत. यापैकी 4 कोटी 57 लाख 1 हजार 877 पुरुष तर 4 कोटी 16 लाख 25 हजार 950 महिला मतदार आहेत. राज्यात 2 हजार 83 नोंदणीकृत तृतीय पंथी मतदार आहेत. 

एक हजार लोकसंख्येमागे मतदार नोंदणीचे प्रमाणही राज्यात उल्लेखनीय आहे. राज्यात एक हजार लोकसंख्ये मागे 710 नोंदणीकृत मतदार आहेत. तर राज्यात एकूण 48 लोकसभा जागांसाठी चार टप्प्यात एकूण 95 हजार 475 मतदान केंद्रावर मतदान घेण्यात येणार आहे. 

देशात 89 कोटी 87 लाख मतदार

देशातील 29 राज्य आणि 7 केंद्रशासीत प्रदेशांमध्ये आजमितीस एकूण 89 कोटी 87 लाख 68 हजार 978 मतदार आहेत. यामध्ये 46 कोटी 70 लाख 4 हजार 861 पुरुष मतदार आहेत तर 43 कोटी 16 लाख 89 हजार 725 महिला मतदार आहेत. देशभरात 31 हजार 292 तृतीय पंथी मतदार आहेत.

English Summary: The right to vote for 11 lakh youth in Maharashtra will be played for the first time
Published on: 17 March 2019, 03:42 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)