News

मॉन्सून राजस्थानातून माघारी परतण्यास अद्यापही पोषक स्थिती नसल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. त्यामुळे मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासाचा मुहूर्त आणखी काही दिवस लांबणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मॉन्सूनचे आगमन आणि परतीच्या वेळा ठरविण्यासाठी गेल्या वर्षीपासून हवामान विभागाने वेळापत्रक जाहीर केले आहे.

Updated on 17 September, 2021 3:15 PM IST

मॉन्सून राजस्थानातून माघारी परतण्यास अद्यापही पोषक स्थिती नसल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. त्यामुळे मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासाचा मुहूर्त आणखी काही दिवस लांबणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मॉन्सूनचे आगमन आणि परतीच्या वेळा ठरविण्यासाठी गेल्या वर्षीपासून हवामान विभागाने वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार १७ सप्टेंबर ही मॉन्सूनच्या राजस्थानातून परतीची नवीन सर्वसाधारण तारीख निश्चित करण्यात आली आहे.

यापूर्वी राजस्थानातून माघारीची तारीख १ सप्टेंबर ठरविण्यात आली होती. मॉन्सूनची संपूर्ण देशातील परतीची सर्वसाधरण तारीक १५ ऑक्टोबर आहे. आणखी आठवडाभर पोषक वातावरण होणार नसल्याने त्यानंतर मॉन्सूनचा परतीचा प्रवासाची दिशा ठरणार आहे. वायव्य भारतात असलेल्या पश्चिम राजस्थानपासून मॉन्सून परतीचा प्रवासाला सुरुवात होते.

यासाठी साधरण १ सप्टेंबरनंतर त्या परिसरात सतत पाच दिवस पाऊस थांबवणे, समुद्रपाटीपासून साधरण ५ ते ८ किलोमीटर उंचीवर घड्याळाचा काट्याच्या दिशेने सभोवताली बाहेरच्या बाजूला वारे वाहणारी स्थिती असणारी क्षेत्रे तयार होणे. तसेच त्या परिसरातील आर्द्रतेची टक्केवारी चांगलीच होणे , असे बदल दिसल्यास मॉन्सूनचा राजस्थानातून परतीचा प्रवास सुरू झाल्याचे समजले जाते. त्यानंतर देशाच्या उर्वरित मॉन्सून परतल्याचे जाहीर करण्यासाठी आर्द्रतेत लक्षणीय घट होणे पाच दिवस पाऊस थांबणे हे वातावरणीय बदल विचारात घेतले जातात.

 

तर मॉन्सून संपूर्ण देशातून परतल्याचे जाहीर करण्यासाठी १ ऑक्टोबरनंतर दक्षिण द्वीपकल्पावर वाऱ्यांची बदलेली दिशा विचारात घेतली जाते. गेल्या पाच वर्षात मॉन्सूनच्या परतीचीवाटचाल पाहता २०१६ मध्ये १५ सप्टेंबर रोजी माघारीस सुरुवात झाली होती. त्यानंतर मात्र मॉन्सूनच्या परतीच्या वाटचाल काहीशी उशिराने होत असल्याचे दिसून आले आहे. २०१७ पासून मॉन्सून सातत्याने सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस राजस्थानातून माघारी फिरत आहे.

English Summary: The return journey of the monsoon will take a few more days
Published on: 17 September 2021, 03:15 IST