News

या ठरावामुळे सामाजिक सुधारणांचा पाया रचणाऱ्या महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्याला सर्वोच्च मान्यता मिळणार आहे. हा निर्णय महाराष्ट्राच्या प्रगतीशील आणि समतावादी भूमिकेला अधोरेखित करणारा आहे.

Updated on 25 March, 2025 3:09 PM IST
AddThis Website Tools

मुंबई : क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना केंद्र सरकारने देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘भारतरत्न’ प्रदान करावाया शिफारशीचा ठराव महाराष्ट्र विधानसभेने मंजूर केला. हा ऐतिहासिक ठराव महाराष्ट्र विधानसभेने एकमताने मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाधान व्यक्त केले.

या ठरावाबाबत विधानसभेत निवेदन करताना मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, “क्रांतिसूर्य महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले हे लोकमान्यतेचे प्रतीक आहेत. भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान या महान विभूतींना तो सन्मान मिळायला हवा.”

या ठरावामुळे सामाजिक सुधारणांचा पाया रचणाऱ्या महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्याला सर्वोच्च मान्यता मिळणार आहे. हा निर्णय महाराष्ट्राच्या प्रगतीशील आणि समतावादी भूमिकेला अधोरेखित करणारा आहे. ‘भारतरत्न’ पुरस्काराच्या माध्यमातून या विभूतींचे कार्य राष्ट्रीय स्तरावर अधोरेखित होणार असूनसंपूर्ण देशासाठी हा अभिमानाचा क्षण असेलअसेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी नमूद केले.

English Summary: The resolution recommending giving 'Bharat Ratna' to Krantisurya Mahatma Phule, Krantijyoti Savitribai Phule was unanimously approved in the Legislative Assembly.
Published on: 25 March 2025, 03:09 IST