राज्यात सध्या अतिरिक्त उसाचा प्रश्न अजूनही संपलेला नाही. असे असताना अनेक ठिकाणी अजूनही ऊस तडतच आहे. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. यामुळे उसाच्या वजनात मोठी घट होणार आहे. शेतकऱ्यांची आर्थिक हानी टाळण्यासाठी अतिरिक्त उसाला उतारा आणि वाहतूक अनुदान देण्याची तयारी महाविकास आघाडी सरकारने दर्शविली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सध्या यामध्ये लक्ष घातले आहे. उसाचे पूर्ण गाळप केल्याशिवाय कारखाने बंद करू नका, असा स्पष्ट आदेश उपमुख्यमंत्र्यांनी दोन दिवसांपूर्वी पुन्हा दिला आहे. यामुळे आता सगळ्यांचा ऊस जाणार का असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. तसेच शिल्लक उसाला वाहतूक अनुदान (Transport Grant) व उतारा घट अनुदान देण्याची ग्वाही देखील त्यांनी दिली आहे. यामुळे आता येणाऱ्या काळात काय होणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
या निर्णयामुळे मात्र साखर उद्योगाला मोठा दिलासा मिळाला आहे. शिल्लक उसाला अनुदान देण्याबाबत स्वतः पवार यांनीच पुढाकार घेतला आहे. ते मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव आणून अनुदानाचा विषय मार्गी लावण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळेच राज्यातील शेतकऱ्यांकडील उसाचे (State Sugarcane Farmer) एक कांडदेखील शिल्लक राहणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
तसेच गाळप पूर्ण केलेल्या कारखान्याची ऊसतोडणी यंत्रणा अधिगृहीत केली तरच मराठवाड्यातील अतिरिक्त ऊस (SugarCane) लवकर तोडला जाईल. अजित पवारांनी याबाबत पुढाकार घेतला असल्याने आता हा प्रश्न लवकरच मार्गी लागेल अशी अपेक्षा आहे. यामध्ये मात्र शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. दीड वर्षांचे ऊस झाले तरी अजूनही तुटले गेले नाहीत. यामुळे दिवसेंदिवस नुकसान वाढत आहे.
महत्वाच्या बातम्या;
तापमान वाढीने केला कहर, हजारो एकरावरील पिकांना लागत आहे आग..
शेतकऱ्यांनो दुध उत्पादन क्षमता वाढवण्याची चिंता मिटली, बातमी वाचा आणि दूध उत्पादन वाढवा
एका गाईच्या खाद्यात १० शेळ्या जगतात, विदेशी शेळीपालन शेतकऱ्यांसाठी ठरतंय वरदान, वाचा सगळी माहिती
Published on: 10 April 2022, 10:34 IST