सध्या शेतकऱ्यांच्या कांद्याला दर नाही. तसेच अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. असे असताना आता किसान सभेचे लाल वादळ उद्या मुंबईत धडकणार आहे. रस्त्यावर शेतमाल फेकून शेतकऱ्यांनी सरकारच्या धोरणांचा जाहीरपणे निषेध व्यक्त केला आहे.
या मोर्चामध्ये शेतकरी, आदिवासी, कर्मचाऱ्यांनीही सहभाग असल्यामुळे या लाँग मार्चला आता सरकार कसे तोंड देणार ते उद्याच कळणार आहे. सरकार या प्रतिनिधीशी बोलणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, दिंडोशी आणि नाशिकमधून निघालेले लाल वादळ विधानभवनावर धडकणारच असल्याचा ठाम निर्धार किसान सभेने केला आहे. यामुळे हे वादळ मिटणार का अजूनच वाढणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भीमा पाटस कारखान्यात 500 कोटींचा गैरव्यवहार? संजय राऊतांच्या आरोपाने उडाली खळबळ
तसेच लाल वादळ विधानभवनावर आल्यानंतर आता सरकारतर्फे आंदोलनकर्त्यांशी कोण संवाद साधणार असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. आता याबाबत लवकरच माहिती समोर येईल.
Cashew: आफ्रिकेतील काजू, पंढरपूरमध्ये प्रक्रिया, ओझेवाडीचा शेतकरी मोळवतोय लाखोंचा फायदा..
यामुळे शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. किसान सभेचे अजित नवले , जे. पी. गावित यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढला गेला असून यामध्ये आता कष्टकरी, आदिवासी आणि कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.
एरंडीची लागवड आहे खूपच फायदेशीर, दुर्मिळ होत असताना मिळेल फायदा
अखेर कांदा उत्पादक शेतकऱ्यांबाबत सरकारला आली जाग! मुख्यमंत्री शिंदेंची विधानसभेत मोठी घोषणा
उन्हाळ्यात नाकातून होणारा रक्तस्राव टाळा
Published on: 14 March 2023, 09:46 IST