काल भारतीय किसान युनियनशी संबंधित मोठी बातमी समोर आली. येथील शेतकरी आंदोलनाचा प्रमुख चेहरा असलेले राकेश टिकैत यांना बीकेयूमधून बाहेर काढण्यात आले आहे. त्याचवेळी त्यांचे बंधू नरेश टिकैत यांचीही अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी राजेश चौहान यांना अध्यक्ष करण्यात आले आहे.
बीकेयूचे संस्थापक दिवंगत चौधरी महेंद्रसिंग टिकैत यांच्या पुण्यतिथीनिमित्त रविवारी, १५ मे रोजी लखनऊ येथील ऊस उत्पादक संस्थेत बीकेयूच्या नेत्यांची एक मोठी बैठक झाली, ज्यामध्ये टिकैत बंधूंविरोधात हा निर्णय घेण्यात आला. टिकैत कुटुंबाविरोधात शेतकऱ्यांमध्ये असलेल्या या नाराजीनंतर भारतीय किसान युनियनमध्ये फूट पडण्याची चिन्हे आहेत.
बीकेयूचे अनेक सदस्य संघटनेचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांच्या कारवायांवर नाराज होते. राकेश टिकैत यांनी आपल्या राजकीय वक्तव्यांनी आणि कारवायांमुळे आपल्या अराजकीय संघटनेला राजकीय स्वरूप दिल्याचा आरोप या शेतकरी नेत्यांनी केला आहे. बीकेयू नेत्यांच्या नाराजीची बातमी मिळताच राकेश टिकैतही शुक्रवारी रात्री लखनौला पोहोचले. मात्र, या प्रयत्नात त्यांना यश मिळू शकले नाही.
संतप्त शेतकरी नेत्यांचे नेतृत्व करणारे बीकेयूचे उपाध्यक्ष हरिनाम सिंग वर्मा यांच्या निवासस्थानी राकेश टिकैत संघटनेच्या असंतुष्ट नेत्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, त्यात यश न मिळाल्याने ते मुझफ्फरनगरला परतले. आता पुढे लाय घटना घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या या बैठकीला उपस्थित असलेले सर्व शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्यावर नाराज असल्याचे सांगण्यात आले.
राकेश टिकैत यांनी आंदोलनाचा वैयक्तिक फायदा घेतल्याचा आरोप या शेतकऱ्यांनी केला. राकेश टिकैत हे वेगवेगळ्या पक्षांच्या मंचावर जात असल्याचा आरोप देखील यावेळी शेतकऱ्यांनी केला. त्यामुळे नरेश सिंह टिकैत यांना युनियनच्या अध्यपदावरून हटवण्यासह राकेश टिकैत यांना युनियनमधून काढून टाकण्याचा प्रस्ताव आणण्यात आला. त्यानंतर दोघांनाही संघटनेतून बाहेर करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.
महत्वाच्या बातम्या;
किसान क्रेडिट कार्डवरील व्याज सरकार माफ करणार? व्हायरल मेसेजमुळे शेतकऱ्यांची पळापळ
ब्रेकिंग! राकेश टिकैत यांची भारतीय किसान युनियनमधून हकालपट्टी, भावाला अध्यक्षपदावरूनही काढले...
छोट्याशा वेलचीचे आहेत अनेक फायदे, बातमी वाचून होईल फायदाच फायदा...
Published on: 16 May 2022, 10:15 IST