सध्याचा काळ हा छोट्या व्यवसायिकांना आणि स्टार्ट-अप खूप महत्त्वाचा आहे. केंद्र सरकारही स्टार्ट-अपसाठी मदत करत असून अनेक योजनेच्या माध्यमातून स्टार्ट-अपला प्रोत्साहन देत आहे. आता बँकांकडून छोट्या उद्योगांना आणि स्टार्टअपसाठी कर्ज उपलब्ध करून देत आहे.देशातील सर्वच छोट्या-मोठ्या स्टार्ट-अपसाठी आनंदाची बातमी असून, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या सर्व स्टार्टअपचा कर्ज देण्यासाठी आवश्यक असलेल्या प्राधान्य क्षेत्रात समावेश केला आहे. यामुळे आता शेती, छोटे, मध्यम आणि लघु उद्योग, घरबांधणी क्षेत्र यांबरोबर आता सर्वच स्टार्ट-अप ना मोठ्या प्रमाणावर बँकाकडून कर्ज उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. आरबीआय नुकतीच बंगलोर येथे ही घोषणा केली.
आयबीआयच्या निर्णयाचा स्टार्टअप क्षेत्रातील लोकांनी स्वागत केले आहे. केंद्रीय बँकेने जास्तीत जास्त बुद्धिमत्ता या क्षेत्रात येऊन देशाचा विकास व्हावा, यासाठी हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आता स्टार्टअपना सागरी आणि खासगी बँकांकडून कर्ज मिळणं सोपं होणार आहे. आता बँकांना कर्ज देताना स्टार्ट-अपचा प्राध्यान्याने विचार करावा लागणार आहे. आतापर्यंत या स्टार्ट-अप खासगी ना खासगी भांडवलावर अवलंबून राहावे लागते. भांडवलाची कमरता झाल्याने अनेक प्रयोग बंद करावे लागतात. तरुणांना पैसे उपलब्ध होऊन त्याद्वारे नवनवीन रोजगार उपलब्ध व्हावे, या बँकेचा उद्देश आहे. दरम्यान केंद्र सरकारने एमएसएमई क्षेत्राला ३ लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. याशिवाय या क्षेत्रासाठी विना- तारण कर्ज मिळणार आहे. हे कर्ज मिळण्याची मुदत ३१ ऑक्टोबर २०२० असणार आहे. म्हणजेच हे कर्ज ३१ ऑक्टोबर २०२० पर्यंत घेता येणार आहे.
Published on: 08 August 2020, 07:22 IST