आपला भारत देश हा दुग्ध व्यवसायात जगात अव्वल स्थानी आहे शिवाय भारत देश हा कृीप्रधान देश सुद्धा आहे त्यामुळे येथील बरेच लोक शेती आणि पशुपालन या व्यवसायावर अवंबून आहेत. शेती आणि पशुपालन हे महत्वाचे उद्योग शेतकरी वर्गाचे आहेत त्यामुळे त्यांचं सर्वांगीण जीवन या वरच अवलंबून आहे.
गेल्या काही दिवसांपासून दुधाचे भाव हे स्थिरावले होते परंतु महागाई मुळे पशू खाद्याचे भाव हे दिवसेंदिवस वाढत च चालले होते. परंतु मागील 4 ते 5 महिन्याच्या काळात दुधाच्या भावात 3रुपये प्रती लिटर एवढी वाढ झाली होती तेव्हापासूनच दुधाच्या भावात हळूहळू वाढ होऊ लागली आहे दूध भाव वाढीचे कारण असे आहे की, देशाच्या पातळीवर दुधाचे घटते उत्पादन असल्याने दुधाच्या भावात दिवसेंदिवस वाढत होताना दिसत आहे.
यंदाच्या 2 महिन्यात दुधाच्या भावामधे सलग 3 वेळा भाववाढ झाली आहे त्यामुळे शेतकरी वर्ग समाधानी झाला आहे शिवाय यामधून शेतकरी वर्गाला बक्कळ नफा सुद्धा मिळत आहे. आपल्या देशातील सततच्या हवामान बदलामुळे दूध उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे तब्बल ही घट 11 टक्के एवढी आहे.
देशात 11 टक्क्यांनी घटले दुधाचे उत्पादन:-
शेती आणि पशुपालन व्यवसायात मोठ्या प्रमाणात वाढ व्हावी म्हणून केंद्र सरकार आणि राज्य सरकार नेहमी शेतकरी बांधवांच्या हितासाठी वेगवेगळे निर्णय घेत असते तसेच भारत हा एक कृषिप्रधान देश आहे शिवाय जगात दुग्ध व्यवसायात अग्रेसर आहे. देशातील निम्म्याहून अधिक जनता ही शेती आणि पशुपालन व्यवसायात पारंगत आहेत. परंतु दुग्ध व्यवसायात अग्रेसर असून सुद्धा यंदाच्या वर्षी देशातील दूध उत्पानात 11 टक्क्यांची घट झाली असल्याने दुधाचे दर वाढून सुद्धा उत्पादनात घट च आहे.
शास्त्रज्ञांचे संशोधन हाच पर्याय:-
सध्या देशात दूध उत्पादनात घट झाली असली तरी त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ कशी करायची याअनुशंगाने शास्त्रज्ञांचे संशोधन हे सुरु आहे. दूध उत्पादनात घट झाल्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहेत आणि त्यावर उपायोजना म्हणून विविध मार्ग राबवले जात आहेत. सततच्या बदलत्या वातारणामुळे आणि हवामानामुळे दुधाच्या उत्पादनात घट झाल्याचे म्हंटले जात आहे यावरच संशोधन करून उपाययोजना केल्या जातील असे सांगितले आहे. भाव वाढीची अनेक कारणे आहेत यामधे वाढत्या चाऱ्याचे दर, पशुखड्याचे भाव दिवसेंदिवस वाढतच चालले आहे त्यामुळे दुधाचे भाव सुध्दा वाढत चालले आहेत. शिवाय यंदा च्या वर्षी भारतातील दूध उत्पादनात 11 टकक्यांपर्यंत घट झाली असल्यामुळे भावात अजून वाढ होण्याची शक्यता आहे.
Published on: 30 August 2022, 05:14 IST