अतिरिक्त उसाचा (Excess sugarcane) प्रश्न मार्गी लावण्यासाठी अनेक प्रयन्त केले जात आहेत. गेल्या सहा महिन्यापासून गाळप हंगाम सुरु आहे तरी मात्र, ऊस (sugarcane) हा फडातच आहे. वेळेवर तोड न झाल्याने वजनात तर घट होत आहे. आता ऊस फडातच वाळून जात आहे.
गाळप हंगाम अंतिम टप्प्यात तरी मात्र अजूनही 80 लाख टन उसाचे गाळप होणे बाकी आहेत. आता उसतोड मजुरांनी परतीची वाट धरली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा ऊस हा फडातच आहे. विशेषत: मराठावड्यात भयाण स्थिती असून शेतकरी ऊस पेटवून क्षेत्र रिकामे करु लागले आहेत.
गुजरात, कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्याने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. एप्रिल अखेरपर्यंत ही यंत्रे राज्यात दाखल होणार असून मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून ऊस तोडणीला सुरवात होणार आहे. महिनाभर सलग तोड झाल्यास अतिरिक्त उसाचा प्रश्न मार्गी लागेल. असा विश्वास राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने व्यक्त केला.
कृषी यांत्रिकीकरणाला चालना देण्यासाठी आता कृषी यंत्रावर मिळणार अनुदान
सर्वात मोठ्या नगदी पिकाची अशी अवस्था झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. उसाचे क्षेत्र कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात असले तरी शाश्वत उत्पन्न म्हणून याकडे पाहिले जात आहे. राज्यातील अन्य भागातही ही समस्या कायम आहे.
वीज तुटवडा भरून काढण्यासाठी राज्य सरकारची धडपड; ऊर्जामंत्र्यांचा छत्तीसगढ दौरा
Published on: 21 April 2022, 03:02 IST