कृषी कायद्यांना समजावून देण्यासाठी रायसेन येथे किसान संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायद्याविषयी पसरवल्या जात असलेल्या गोष्टी विषयीचा भ्रम दूर केला. शेतकऱ्यांना मोदी यांनी विश्वास दिला की, एम एस पी बंद होणार नाही तसेच सोबत त्यांनी म्हटले की बाजार समिती ही कधीही बंद होणार नाही.
पंतप्रधान मोदी यांनी कायद्याने असलेल्या बऱ्याच गोष्टींविषयी संभ्रम दूर केला. तसेच बऱ्याच गोष्टींची असलेले सरकार चा विचार त्यांनी स्पष्ट केला. शेतकऱ्यांना मोदी यांनी विश्वास दिला की, एम एस पी आणि बाजार समित्या कधी बंद होणार नाही. मोदी म्हणाले की, नवीन तंत्रज्ञानाच्या आधारे शेतकऱ्यांना सरळ लाभ मिळेल. अगोदर शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड मिळत नव्हते. पुढे बोलताना ते म्हणाले की, देशातील सगळ्या शेतकर्यांना किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करण्यासाठी नवीन नियमांमध्ये बदल केला आहे. या कार्डमुळे शेतकऱ्यांना जादा व्याजाने कर्ज घेणे पासून पासून मुक्तता मिळेल. मोदी आणि शेतकऱ्यांना उद्देशून म्हटले की, सरकारचा उद्देश आहे की त्याच्या मध्ये शेतमाल साठवणुकीसाठी गोदाम निर्मितीसाठीचे नेटवर्क निर्माण केले आहे.
हेही वाचा :कोरोना संकटात साखरेचे 73 लाख टनांपेक्षा जास्त उत्पादन
आता मागे नाही राहणार देशातील शेतकरी:
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, भारतातील शेतकरी मागे राहणार नाहीत. जे काम पंचवीस-तीस वर्षांत व्हायला पाहिजे होते ते आत्ता करावे लागले. अगोदर लोक आपल्या जाहीरनाम्यात या सुधारण्यासाठी आग्रही होते. परंतु त्यांचे प्राथमिक आता शेतकरी नाहीत असे ते म्हणाले. नरेंद्र मोदी म्हणाले की, आता जे कृषी क्षेत्रात सुधारणा झाल्या आहेत त्या विरोधकांनी अगोदर केलेल्या जाहीरनाम्यात पेक्षा वेगळ्या नाहीत. पुढे बोलताना ते म्हणाले की, त्यांची समस्या ही सुधारणा विषय नाही तर या सुधारणा मोदींनी केला यालाच आक्षेप आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून वार केले जात आहेत. जे लोक शेतकऱ्यांच्या नावावर आंदोलन करत आहेत, ते जर सत्तेत राहिले तर शेतकऱ्यांसाठी काय करते याची आठवण ठेवायला हवी. विरोधी लोक स्वामीनाथन आयोगाच्या अहवालाला जवळा आठ वर्ष दाबून ठेवले होते. पुढे ते म्हणाले की या लोकांनी शेतकऱ्यांना राजकारणासाठी वारंवार वापरले आहे. मोदी म्हणाले की त्यांनी स्वामीनाथन आयोगाच्या अहवालाला त्याच्या समोर आणले आणि एम एस पी मध्ये वाढ केली.
Published on: 19 December 2020, 04:27 IST