News

आपल्या शेतात अनेक वेगवेगळ्या प्रकारची पिके घेतो त्यामध्ये ज्वारी बाजरी गहू मका कांदा कापूस या प्रकारची पिके असतात. कापूस हे एक नगदी प्रकारचे खरीप पीक आहे.कापूस हा खरीप हंगामातील पीक आहे. यंदाच्या साली पावसामुळे खरीप पिकांचे खूप नुकसान झाले आहे त्यामुळे 50 टक्के पिके ही पाण्याखाली गेली किंवा खराब झालेली आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गाला चांगलाच फटका मिळाला आहे. परंतु पावसाच्या नासाडीमुळे पिके खराब होऊन उत्पन्न कमी झाले परंतु पिकांचे भाव यामुळे भरघोस वाढायला लागले आहेत.

Updated on 10 October, 2021 8:46 PM IST

आपल्या शेतात अनेक वेगवेगळ्या प्रकारची पिके घेतो त्यामध्ये ज्वारी बाजरी गहू मका कांदा कापूस या प्रकारची पिके असतात. कापूस हे एक नगदी प्रकारचे खरीप  पीक  आहे.कापूस  हा खरीप हंगामातील पीक आहे. यंदाच्या साली पावसामुळे खरीप पिकांचे खूप नुकसान झाले आहे त्यामुळे 50 टक्के पिके ही पाण्याखाली गेली किंवा खराब झालेली आहेत.त्यामुळे शेतकरी वर्गाला चांगलाच फटका मिळाला आहे. परंतु पावसाच्या नासाडीमुळे पिके खराब होऊन उत्पन्न कमी झाले परंतु पिकांचे भाव यामुळे भरघोस वाढायला लागले आहेत.

चालू हंगामात बाजारात कापसाला 6900-7000 रुपये प्रति क्विंटल एवढा भाव:

सोयाबीनचे सुद्धा तसेच घडले उत्पन्न घटल्याल्यानंतर सोयाबीन चे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. याचबरोबर पांढरे सोने म्हणजेच कापसाचे सुद्धा भाव  वाढत  आहेत. महाराष्ट्र  राज्यात एकूण पंचाऐंशी 85 लाख गाठी कापसाचे धोरण होते परंतु पावसाच्या नासाडीमुळे हे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटलेले आहे. डायरेक्ट 85 लाख  गाठी वरून  कापसाचे  उत्पन्न  75  लाखांवर आलेले आहे.त्यामुळे आपल्याला कापसाच्या दरात वाढ झालेली दिसून येत आहे. चालू हंगामात बाजारात कापसाला 6900-7000 रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळत आहे. परंतु हमी भाव हा 6025 रुपये एवढा दिला जात आहे.

हमीभावापेक्षा शेतकऱ्याला जास्त भाव मिळत असून ही उत्पन्न घेतल्यामुळे कापसाचे भाव अजून वाढणार असा सुद्धा  अंदाज  लावला  जात  आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी  वेचलेला  कापूस  हा साठवून ठेवण्यावर भर दिला पाहिजे यातून शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असल्याचे दिसत आहे. कॉटन फेडरेशन आणि  सीसीआय दोन्ही कॉटत  एजंसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले  आहे की, आमच्या एजन्सी कापूस खरेदीसाठी तयार आहे.परंतु बाजारात नोव्हेंबर पर्यंत कापूस(cotton)  येण्याची दाट शक्यता  आहे. तसेच कॉटन फेडरेशन एजन्सी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात 70 केंद्र उघडण्यासाठी परवानगी काढली आहे. तसेच विदर्भात 40 केंद्र सुरू करणार आहे, असे सांगितले आहे.गतवर्षी कॉटन फेडरेशन एजन्सी ने महाराष्ट्र राज्यात 7.44 लाख गाठ कापसाची खरेदी केली होती.

तसेच यंदाच्या वर्षी सुद्धाजवळपास याप्रमाणातच कापसाची खरेदी केली जाणार आहे. तसेच जर का शेतकऱ्यांनी केंद्रावर येऊन कापूस घातला तर कापसाची खरेदी ही 10 लाख गठिपर्यंत केली जाऊ शकते.यंदाच्या वर्षी पावसामुळे कापसाचे (cotton)उपन्न मोठ्या प्रमाणात घटल्यामुळे कापसाचे भाव वाढत आहेत. तसेच या वेळी कापसाला हमी भावापेक्षा जास्त दर मिळत आहे.कापसाची साठवण करून ठेवल्यास सुद्धा मोठा फायदा शेतकऱ्याला होणार आहे. त्यामुळे कापसाची साठवणूक करणे फायदेशीर ठरुन त्यातून जास्त मोबदला मिळू शकतो.

English Summary: The price of 'white' gold will skyrocket this year and it will be beneficial to stockpile cotton
Published on: 10 October 2021, 08:34 IST