News

कोकणात सध्या बहुतांश भाज्यांचे दर शंभरी पार झाले आहेत. यात घेवडा, गाजर, फरसबी, हिरवी मिरची, मटार, भेंडी या भाज्यांनी किलोचा शंभरी दर पार केला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे.

Updated on 01 September, 2023 1:46 PM IST

रत्नागिरी

पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीच्या कोकणातील भाजीपाल्यांला चांगलाच फटका बसला आहे. पश्चिम महाराष्ट्रातून कोकणात भाजीपाला विक्रीसाठी जात असतो. पण पावसामुळे भाजीपाल्याची आवक घटल्याने कोकणतील भाजीपाल्यात २० टक्के घट झाली आहे.

कोकणात सध्या बहुतांश भाज्यांचे दर शंभरी पार झाले आहेत. यात घेवडा, गाजर, फरसबी, हिरवी मिरची, मटार, भेंडी या भाज्यांनी किलोचा शंभरी दर पार केला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. तर अनेकांना पालेभाज्या खाण्याकडे देखील दुर्लक्ष केले आहे.

मागील काही दिवसांत राज्यात सर्वत्र चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे रानभाज्यांची चांगल्या प्रकारे आवक होत आहे. त्यामुळे नागरिकांनी त्याला पसंती द्यायला सुरुवात केली आहे. तसंच रानभाजी शरीरासाठीही उत्तम असल्याने नागरिकांचा दिवसेंदिवस रानभाज्यांकडे कल वाढत आहे.

मागील काही दिवसांपासून सततच्या पावसामुळे धान्य, फळभाज्या आणि पालेभाज्यांचे नुकसान झाले आहे. पावसामुळे रोजच्या तुलनेत बाजारात आवक घटली आहे. बाजारात मागणी अधिक आणि आवक कमी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

English Summary: The price of vegetables made citizens cry Rates crossed a century
Published on: 09 August 2023, 04:55 IST