News

कोविड 19 महामारी च्या प्रभाव असल्यावर सुद्धा भारतीय शेतकऱ्यांनी 2020 -21 या आर्थिक वर्षात नऊ लाख ट्रॅक्टर खरेदी केले. आता 2021 – 22 हे आर्थिक वर्ष सुरू झाले आहे असून ट्रॅक्टर कंपनींना यावर्षी सुद्धा चांगली विक्री होण्याची अपेक्षा आहे.

Updated on 01 June, 2021 10:31 PM IST

 कोविड 19 महामारी च्या प्रभाव असल्यावर सुद्धा भारतीय शेतकऱ्यांनी 2020 -21 या आर्थिक वर्षात नऊ लाख ट्रॅक्टर खरेदी केले. आता 2021 – 22 हे आर्थिक वर्ष सुरू झाले आहे असून ट्रॅक्टर कंपनींना यावर्षी सुद्धा चांगली विक्री होण्याची अपेक्षा आहे. परंतु या काळामध्ये ट्रॅक्टरच्या किमती वाढण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. वर्ष 2021 च्या सुरुवातीला काही ट्रॅक्टर कंपन्यांनी ट्रॅक्टर यांच्या किमती वाढण्याची घोषणा केली होती व त्यानुसार किमतीमध्ये वाढही केली होती.

 काय आहे किंमत वाढ मागे

सगळ्यात महत्त्वाचे कारण म्हणजे स्टीलच्या दरात झालेली वाढ हे होय. ट्रॅक्टर कंपन्यांचे म्हणणे आहे की, स्टीलच्या किंतीमध्ये जर अशाचप्रकारे वाढ होत राहिली तर येणाऱ्या दिवसांमध्ये ट्रॅक्टरच्या किमतींमध्ये ही वाढ होईल. ही वाढ जवळ-जवळ २० हजारपर्यंत असू शकते. त्यामुळे या क्षेत्रातील ट्रॅक्टर क्षेत्रातील तज्ञांचे म्हणणे आहे की, जर शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदी करायचे असेल तर आताची वेळ ही सगळ्यात उपयुक्त आहे. बऱ्याच कंपन्या covid-19 चे संबंधित बऱ्याच योजनांचा लाभ ग्राहकांना देत आहेत.

 स्टीलच्या किमतींचा ट्रॅक्टर किंमत वाढीत प्रभाव  

 मागील काही दिवसांपासून स्टीलच्या किमतींमध्ये अभूतपूर्व वाढ पाहायला मिळत आहे. किरकोळ बाजारातील आतापर्यंतचा सगळ्यात जास्त किमतीला विकले जात आहे. मे 2021 मध्ये आलेल्या आकडेवारीनुसार हॉट रोल्ड कॉईलची किंमत ४ हजार रुपयांनी वाढून ती सर्वाधिक 67 हजार रुपये प्रती टनपर्यंत पोहोचली आहे तसेच कोल्ड रोल्ड कोईलची किंमत ४ हजार ५०० रुपयांनी वाढून 80000 हजार रुपये प्रति टन झाली आहे. मागील दहा महिन्यांत जवळजवळ 60 टक्के वाढ स्टीलच्या किमतीमध्ये पाहायला मिळाली आहे.

 

स्टीलच्या वाढत्या किमतींचा ट्रॅक्टर इंडस्ट्रीवरील वाढता दबाव

 स्टीलच्या वाढत्या किमतीमुळे ट्रॅक्टर इंडस्ट्री सोबतच अन्य बरेच उद्योगांमध्ये दबाव पाहायला मिळत आहे. मागच्या वर्षापासून स्टीलच्या किमतींमध्ये सलग वाढ होताना दिसत आहे तसेच भविष्यात सुद्धा ही वाढ होईल असे दिसतंय. ट्रॅक्टर इंडस्ट्रीमधील बऱ्याच तज्ञांच्या मते, द स्टीलच्या किमतीमध्ये अशाच प्रकारचे वाढ होत राहिली तर ट्रॅक्टर कंपन्यांना सुद्धा ट्रॅक्टरच्या किंमतीमध्ये वाढ करावी लागू शकते. परंतु ही वाढ किती प्रमाणात होईल हे स्टीलच्या किमतींवर अवलंबून आहे. महत्वाचे म्हणजे ट्रॅक्टर निर्मितीमध्ये स्टील हा सगळ्यात महत्वपूर्ण कच्चा माल आहे, त्यामुळे स्टीलच्या वाढत्या किंमतींचा सरळ प्रभाव हा ट्रॅक्टरच्या किमतींवर होतो.

स्टीलच्या वाढत्या किमतीमुळे यावर्षी भारतातील सगळ्यात प्रमुख ट्रॅक्टर उत्पादक कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये वाढ केली होती. त्यानंतर एप्रिलमध्ये कंपनीने पुन्हा ट्रॅक्टर सीरिजच्या किमतींमध्ये वाढ केली होती. तसेच दुसरी कंपनी एस्कॉर्टने सुद्धा एप्रिल महिन्यात त्यांचे फार्मट्रेक पावरट्रेक आणि डीजी ट्रॅक ट्रॅक्टरच्या मध्ये वाढ केली होती. या पद्धतीने बऱ्याच कंपन्यांनी ट्रॅक्टर च्या किमतीमध्ये वाढ  केली  आहे.

 

जर स्टीलच्या किमतींमध्ये अशाच पद्धतीची वाढ होत राहिली तर बहुतेक कंपन्या ट्रॅक्टरची किंमत किती वाढ करतील हे नक्की. जर शेतकऱ्यांनी सध्याच्या कालावधीमध्ये ट्रॅक्टर खरेदी केले तर त्यांच्यासाठी हा फायद्याचा व्यवहार राहील. ज्या वेगाने स्टीलच्या किमतींमध्ये वाढ होईल त्याप्रमाणेच ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये सुद्धा 30 हजार पासून ते 50 हजारपर्यंत वाढवू शकते असे तज्ञांचे मत आहे.

English Summary: The price of tractors will increase in the Corona crisis
Published on: 01 June 2021, 10:31 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)