मागील काही दिवसांपूर्वी जो मुसळधार पाऊस पडला होता त्याचा परिणाम अजूनही बाजरपेठेवर होत आहे. राज्यातून टोमॅटो ची आवक होत नसल्याने बाजारामध्ये टोमॅटो चे विक्रमी दर पाहायला भेटत आहेत. महाराष्ट्रात टोमॅटो चे दर प्रति किलो ६५ रुपये आहेत तर दिल्ली मध्ये टोमॅटो चे दर प्रति किलो ७५ रुपये आहेत. अतिवृष्टीचा परिणाम फक्त महाराष्ट्र राज्यातच नाही तर कर्नाटक, आंध्रप्रदेश राज्यात सुद्धा टोमॅटो चे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे आवक घटली त्यामुळे दर वाढले गेले.
आवक कमी असल्याने दर वाढ :
अन्न व ग्राहक व्यवहार मंत्रालयाने असे सांगितले आहे की देशाच्या उत्तरेला जे राज्ये आहेत त्या राज्यांमधून टोमॅटो चे आगमन डिसेंबर च्या सुरुवातीस होईल आणि आगमन झाले की आवक पण वाढेल आणि किमतीही कमी होतील. मागील वर्षीच्या तुलनेत डिसेंबर मध्ये आवक होईल अशी शक्यता आहे त्यामुळे काही दिवस अजून जास्त दराने टोमॅटो खरेदी करावे लागतील.
पावसामुळे टोमॅटोचे नुकसान होते:-
या महिन्यात म्हणजेच नोव्हेंबरमध्ये टोमॅटो ची आवक १९ लाख ६२ हजार टन झाली आहे तर मागील वर्षी याचवेळी टोमॅटो ची आवक २१ लाख ३२ हजार झाली होती. टोमॅटो च्या दराबाबत मंत्रालयाने असे सांगितले की पंजाब, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि हिमाचल प्रदेशात अनियमित पाऊसामुळे टोमॅटो च्या किमती वाढल्या.पाऊसामुळे टोमॅटो चे नुकसान झाले त्यामुळे आवक लांबणीवर गेली. तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटक राज्यात मुसळधार पाऊस पडला असल्याने पुरवठा थांबला गेला.
वाढत्या मागणीचाही परिणाम दरावर:-
पूर्ण देशात टोमॅटो प्रति किलो ६५ ते ७० रुपये किलो ने चालला आहे. २५ नोव्हेंबर पर्यंत टोमॅटो ची सरासरी प्रति किलो किमंत ६७ रुपये होती. कृषी मंत्रालयाच्या अहवालानुसार चालू वर्षात टोमॅटो चे उत्पादन ६९ लाख ५२ हजार टन आहे तर मागच्या वर्षी टोमॅटो चे उत्पादन ७० लाख १२ टन होते.
महाराष्ट्रात 65 रुपये किलो टोमॅटोचा दर:-
महाराष्ट्र राज्यात टोमॅटो चे दर ६५ रुपये प्रति किलो ने चालले आहेत जे की डाळिंबापेक्षा ही टोमॅटो चे दर वाढले आहेत. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होत असल्याने टोमॅटो चे दर वाढले आहेत. डिसेंम्बर पर्यंत असेच दर राहतील असा अंदाज कृषी मंत्रालयाने लावला आहे.
Published on: 29 November 2021, 08:35 IST