शेतकरी वर्गावर संकटाची मलिका कायम चालूच असते त्याममध्ये शेतकरी वर्गाला फायदा आणि तोटा हा होतच असतो. अलीकडच्या काळात राज्यातील कापसाचे क्षेत्र घटले आहे. तरी सुद्धा राज्यातील काही भागात अजून सुद्धा कापसाचे विक्रमी उत्पन्न घेतले जाते.
दैनंदिन जीवनात कापसाचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असतो शिवाय गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कापसाखालील क्षेत्र कमी होत चालले आहे त्यामुळे बाजारात कापसाला प्रचंड मागणी आणि उच्च भाव सुद्धा मिळत आहे. तसेच आंतररष्ट्रीय बाजारात सुद्धा मागणी वाढतच चालली आहे.
यंदा च्या वर्षी कापूस उत्पादक शेतकरी हा मालामाल होणार आहे हे नक्कीच कारण चक्क नवीन कापसाला 16 हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळाल्यामुळे शेतकरी वर्गाला मोठ्या प्रमाणात फायदा होत असल्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी सुखावला आहे.
जळगाव मधील बोदवड येथे गणेश चतु्थीनिमित्त कापसाला 16 हजार रुपये हा विक्रमी भाव दिला आहे. तसेच सातगाव डोंगरी पाचोरा येथे कापसाला 14772 रुपये प्रति क्विंटल चा भाव मिळाला आहे. याचबरोबर जळगाव मधे सुद्धा कापसाला 16 हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला आहे. तसेच पहिल्याच दिवशी 1 हजार क्विंटल कापसाची खरेदी केली असून 16हजार प्रति क्विंटल भाव मिळाल्यामुळे शेतकरी वर्ग मालामाल झाला आहे.
कापसाचे आजचे भाव:-
राज्यांमधे कापसाचे भाव हे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे आहेत तसेच बोदवड येथे कापसाला 16 हजार तर सातगाव मधे कापसाला 14 हजार रुपये भाव मिळाला आहे. तसेच धरणगाव आणि जळगाव मधे कापसाला 11155 तर काजगाव मधे 1100 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला आहे. व्यापारी वर्गाच्या मते यंदाच्या वर्षी कापसाला मोठी मागणी असल्यामुळे भावात अजून तेजी येऊ शकते असे सुद्धा सांगितले जात आहे. तसेच पाऊसापासून कापसाचे संरक्षण केले तर यंदा च्या वर्षी शेतकरी वर्गाला कापूस मालामाल करू शकतो.
Published on: 02 September 2022, 11:29 IST