News

मुंबई: अपेडा अर्थात कृषी आणि प्रक्रिया अन्न उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणाच्या वतीने द्राक्ष प्रोत्साहन कार्यक्रम आणि विक्रेता आणि ग्राहक भेटीचे आयोजन करण्यात आले होते. पीएचडीसीसीआय यांच्या सहयोगाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. 2020 पर्यंत भारतीय द्राक्षांची चीनला होणारी निर्यात 200 टक्क्यांनी वाढेल असा अंदाज या कार्यक्रमात व्यक्त करण्यात आला. सध्या चीनला होणारी भारतीय द्राक्षांची निर्यात ही 600 मेट्रिक टन इतकी आहे.

Updated on 28 November, 2018 7:50 AM IST


मुंबई:
अपेडा अर्थात कृषी आणि प्रक्रिया अन्न उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणाच्या वतीने द्राक्ष प्रोत्साहन कार्यक्रम आणि विक्रेता आणि ग्राहक भेटीचे आयोजन करण्यात आले होते. पीएचडीसीसीआय यांच्या सहयोगाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. 2020 पर्यंत भारतीय द्राक्षांची चीनला होणारी निर्यात 200 टक्क्यांनी वाढेल असा अंदाज या कार्यक्रमात व्यक्त करण्यात आला. सध्या चीनला होणारी भारतीय द्राक्षांची निर्यात ही 600 मेट्रिक टन इतकी आहे. या कार्यक्रमप्रसंगी बोलताना अपेडाचे अध्यक्ष पबन के. बोरठाकूर यांनी निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी अपेडाकडून घेण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली.

चीनमधे आपली निर्यात वाढवण्यासाठी अपेडा प्रयत्न करत आहे. ताज्या द्राक्षांची गुणवत्ता सुधारण्यासाठी अपेडाच्या माध्यमातून द्राक्ष उत्पादक राज्य आणि राष्ट्रीय संशोधन केंद्रासह वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय सामूहिक प्रयत्न करत आहे तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रोत्साहनपर योजना भारतीय द्राक्षांच्या निर्यातीला आणखी चालना देतील असे या कार्यक्रमात नमूद करण्यात आले.

वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाअंतर्गत अपेडा कृषी उत्पादनांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत आहे. भारतातून द्राक्ष आयात करण्यासाठी चीन उत्सुक असल्याचे चीन अन्नपदार्थ आयात संघटनेचे झाँग लिशान यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमामुळे यावर्षीची निर्यात 1,000 मेट्रिक टनापर्यंत वाढून लवकरच 2000 मेट्रिक टनाचा टप्पा गाठेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. परदेशी व्यापार विभागाचे संयुक्त महासंचालक व्ही. चतुर्वेदी तसेच दोन्ही देशांचे या क्षेत्रातील प्रतिनिधी आणि इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.

English Summary: The possibility of growth of grape exports from India to China
Published on: 28 November 2018, 07:48 IST