महाराष्ट्रात (Maharashtra) सध्या कांदा उत्पादक शेतकरी (Onion Grower Farmer) कांद्याला अतिशय कवडीमोल दर (Onion Rate) मिळत असल्यामुळे मोठ्या चिंतेत सापडला आहे. सध्या मिळत असलेल्या दरात उत्पादन खर्च काढणे देखील अशक्य असल्याचे कांदा उत्पादक नमूद करत आहेत.
हे संकट कमी होते की काय म्हणून सटाणा तालुक्यातील एका कांदा (Onion Crop) उत्पादक शेतकऱ्याला एका वेगळ्याचं कारणामुळे हजारो रुपयांचा फटका बसला आहे. तालुक्यातील मौजे जुने शेमळी येथील नवयुवक शेतकरी कैलास रमेश पवार यांनी निम्म्या वाट्याने उत्पादीत केलेल्या साठवणुकीतल्या कांद्यावर अज्ञात इसमाने युरिया टाकून कांद्याची नासाडी करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
महत्वाच्या बातम्या:
Poultry Farming : उन्हाळ्यात 'या' पद्धतीने करा कोंबडीचे संगोपन; होणार फायदा
याबाबत अधिक माहिती अशी की, कैलास यांनी त्यांच्या गावातील रामदास धर्डा यांच्या दोन एकर शेतजमिनीत कांदा पिकांची लागवड (Onion Farming) केली होती. नुकत्याच दोन दिवसांपूर्वी त्यांनी लागवड केलेल्या कांद्याची काढणी केली.
कांदा काढणी केल्यानंतर कांदा वाळवण्यासाठी शेतातच कांदा पात टाकून झाकून ठेवला होता. या झकलेल्या कांद्यावर काल रात्री अज्ञात इसमाकडून युरिया शिपडून नासाडी करण्यात आली. कैलास यांच्या सुमारे 150 क्विंटल कांद्याला याचा फटका बसल्याचे उघड झाले आहे. यामुळे कवडीमोल दर मिळतं असल्यामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.
कैलास यांची घरची आर्थिक परिस्थिती खुपच बिकट आहे. मात्र तरीदेखील पैशांची जमवा-जमव करीत त्यांनी निम्म्या वाट्याने कांद्याची लागवड केली. परिसरात कांदा लागवडी दरम्यान भीषण मजूर टंचाई होती. या विपरीत परिस्थितीत अधिकचा पैसा मोजून कैलास यांनी कांद्याची लागवड केली.
कांदा लागवड केल्यानंतर बदलत्या वातावरणामुळे वेळोवेळी महागड्या औषधांची फवारणी करावी लागली. कशीबशी पैशांची जुळवाजुळव करत कैलास यांनी कांद्याचे यशस्वी उत्पादन घेतले. मात्र कैलास यांचे हे यश काही अज्ञात व्यक्तींना सहन झाले नाही म्हणून काल रात्री त्यांच्या शेतातील काढणी झालेल्या कांद्यावर युरिया टाकून कांद्याची नासाडी करण्यात आली.
यामुळे कैलास यांचे मोठे नुकसान झाले असून कैलास यांनी या प्रकरणात सखोल चौकशीची मागणी केली आहे. सदर प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई केली जावी अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
कैलास यांनी वेळेत पाहणी केल्यामुळे हा प्रकार लवकर उघडकीस आला आहे. मात्र आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सावध राहणे आवश्यक असल्याचे कृषी विभागाकडून सांगितलं गेलं. या प्रकरणाची कृषी विभागाकडून पहाणी केली जाणार असल्याचे समजतं आहे.
Published on: 08 May 2022, 11:34 IST