News

पंजाबमधील कर्नाल आणि शेजारील परिसरातील हजारो शेतकरी केंद्र सरकारच्या कृषी कायद्याच्या विरोधात चालू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा आणि आंदोलनामध्ये सहभाग घेण्यासाठी हजारोच्या संख्येने सिंघु बॉर्डर ला पोहोचले. त्याबद्दलची माहिती संयुक्त किसान मोर्चाने दिली आहे.

Updated on 24 May, 2021 11:50 AM IST

पंजाबमधील कर्नाल  आणि शेजारील परिसरातील हजारो शेतकरी केंद्र सरकारच्या कृषी कायद्याच्या विरोधात चालू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा आणि आंदोलनामध्ये सहभाग घेण्यासाठी हजारोच्या संख्येने सिंघु बॉर्डर ला पोहोचले. त्याबद्दलची माहिती संयुक्त किसान मोर्चाने दिली आहे.

आंदोलनामध्ये सहभागी असलेल्या 40 युनियनचे मुख्य संघटना असलेल्या संयुक्त किसान मोर्चा निवेदनात म्हटले की, पिकांच्या काढणीनंतर आणि आता हंगाम संपत आल्याने दिवसेंदिवस शेतकरी दिल्लीच्या सीमेवर पोहोचत आहेत. याबाबत माहिती देताना संयुक्त  किसान मोर्चा यांनी सांगितले की, त्यांची सगळी सदस्य हे हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर आणि या महिन्यात हिस्सार मध्ये झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांकडून झालेला हल्ला याचा निषेध म्हणून सोमवारी हिस्सार  आयुक्त कार्यालयाला घेराव घालतील. केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्याच्या विरोधात आणि ते कायदे  वापस  घ्यावेत या मागणीसाठी मागच्या वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यापासून हजारो शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करीत आहेत.

 

याबाबत माहिती देताना संयुक्त  किसान मोर्चा ने म्हटले की, वेगवेगळ्या वाहनांच्या मदतीने हजारो शेतकरी रविवारी सिंगू बॉर्डरला पोहोचले शेतकरी नेते गुर्णाम सिंह चढुनी यांच्या नेतृत्वामध्ये कर्नाल  आणि आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात जमाव या ठिकाणी दाखल झाला आहे. दिलेल्या माहिती त्यांनी म्हटले की, पिकाची काढणी आणि कापणीसाठी बरेच शेतकरी गावी वापस गेले होते ते आता परत प्रदर्शन ठिकाणी वापस येत आहेत.  सगळे शेतकरी हे  उत्साहात  असून मागण्या पूर्ण झाल्यावरच आंदोलन संपवण्यात येईल असे त्यांनी सांगितले. तसेच शेतकऱ्यांनी गाजीपूर बॉर्डरवर तिरंगा मार्च आयोजित केला होता.

 

संयुक्त किसान मोर्चाने  सांगितले की, आंदोलन करणारे शेतकरी हे सोमवारी स्वातंत्र्यसेनानी कर्तारसिंग सराभा यांची जयंती साजरी करणार आहेत. हिस्सार पोलिसांनी 16 मे रोजी कोविंड हॉस्पिटल च्या उद्घाटनासाठी आलेले खट्टर  येथील आयोजन स्थळ येथे जाण्यासाठी मज्जाव करताना समूहावर कथितरित्या  लाठी  चार्ज केला होता आणि अश्रू गॅसचे गोळे सोडले होते. याबाबत शेतकऱ्यांनी दावा केला होता की लाठीचार्ज मध्ये 50 पेक्षा जास्त शेतकरी जखमी झाले होते.. तसेच एक अधिकृत राव त्याने सांगितले होते की या घटनेमध्ये एका डीएसपी समवेत वीस पोलिस कर्मचारी जखमी झाले होते.

English Summary: The peasant movement was intensifying again; Thousands of farmers reached Singhu Border from Karnal
Published on: 24 May 2021, 11:34 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)