बीड जिल्ह्यातील उसाच्या आगीला दिवसेंदिवस वाढत होत चालली आहे. जे की उसाच्या आगीच्या घटनेमध्ये सर्वाधिक दोषी ठरवले जातेय ते फक्त महावितरण विभागाला. महावितरणच्या घाळ कारभारामुळे परिसरात अशा घटना घडत आहेत. जे की शॉर्टसर्किट तसेच विद्युत तारांची पडझड होत असल्याने उसाला आग लागत आहे. त्यापैकी एक म्हणजे वादळ सुटले की तारांचे एकमेकांना घर्षण होते आणि त्यामधून ठिणग्या पडल्या की उसाला आग लागत आहे. आधीच उसाचा हंगाम शेवटच्या टप्यात आला आहे तरी अजून ऊस फडातच आहे त्यामुळे शेतकऱ्यांना एक टेन्शन कमी आहे काय तो पर्यंत दुसऱ्या बाजूला महावितरणाचा घाळ कारभार यामुळे शेतकऱ्यांचे दिवसेंदिवस नुकसानच होत निघाले आहे.
वडवणीत 4 एक्कर ऊस जळून खाक :-
बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यात परडी माटेगाव या परिसरात रविवारी पहाटे एका शेतकऱ्याच्या ४ एकरातील उसाच्या फडाला शॉर्टसर्किटमुळे आग लागलेली आहे. या शेतकऱ्याचे नाव नवनाथ शेंडगे असावं आहे जे की नवनाथ यांनी त्यांच्या ४ एकर शेतामध्ये उसाचे पीक घेतले होते. अगदी शेवटच्या टप्यात असणाऱ्या उस पिकाला रविवारी पहाटे आग लागली असल्याने नवनाथ यांचा पूर्ण ऊस जळून खाक झालेला आहे. ४ एकर उसामधून नवनाथ शेंडगे यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
अतिरिक्त ऊसाचा प्रश्न कायम :-
यंदा उसाच्या क्षेत्रामध्ये वाढ झालेली आहे जसे की पश्चिम महाराष्ट्रात ज्याप्रकारे उसाचे क्षेत्र असते त्याचप्रकारे मराठवाडा विभागातील शेतकऱ्यांनी सुद्धा यंदा उसाचे क्षेत्र वाढवले आहे. मराठवाडा म्हणजे दुष्काळी भाग म्हणले जाते मात्र आता शेतकऱ्यांनी ती ओळख पुसलेली आहे. मराठवाडा मधील कारखान्यांनी यंदा क्षमतेपेक्षा जास्त उसाचे गाळप करून सुद्धा अतिरिक्त उसाचा प्रश्न उदभवला आहे. ऊस अगदी शेवटच्या टप्यात आहे म्हणजेच उसाला १२ महिने होऊन गेले असल्याने उसाच्या वजनात घट होत हवं तसेच वाढत्या उन्हामुळे उत्पादनावर सुद्धा परिणाम होत आहे.
डोळ्यादेखत ऊसाच्या फडाला आग :-
नवनाथ शेंडगे शेतकरी रविवारी पहाटे आपल्या शेतातच होते जे की त्यावेळी त्यांच्या ४ एकरातील उसाला आग लागली. अगदी नवनाथ शेंडगे या शेतकऱ्याच्या डोळ्यादेखत आग लागली होती मात्र ते काहीच करू शकले नाहीत. उसाची पाचट आणि वाहते वारे यामुळे अवघ्या काही क्षणातच ४ एकर ऊस जळून खाक झाला. नगदी पिकातील प्रथम क्रमांकावर असणारे पीक म्हणजे ऊस. लाखो रुपयांचा खर्च करून घेतले जाणारे हे पीक. शेतकऱ्यांची आर्थिक व्यवस्था ही या पिकावरच अवलंबून असते मात्र वर्षभर केलेली पिकाची जोपासना आणि नवनाथ यांची मेहनत अगदी काही क्षणातच राखेत मिळाली. नवनाथ यांची मागणी आहे की किमान गेलेला उसाला खर्च तरी सरकारने द्यावा. जे की आतापर्यंत यंदाच्या हंगामात बीड जिल्ह्यामध्ये ४०० एकर ऊस महावितरणच्या चुकीमुळे जळून खाक झालेला आहे.
Published on: 20 March 2022, 07:42 IST