News

भारत एक कृषिप्रधान देश (Agricultural country) आहे आणि या कृषिप्रधान देशातच शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिवसेंदिवस वाढत आहेत. जगाचा पालन पोषण करणारा शेतकरी राजा कर्जापोटी तसेच इतर अनेक कारणांमुळे आत्महत्या करण्यास विवश होतो. देशात सर्वत्र शेतकरी आत्महत्याचे (Farmer suicide) प्रमाण वाढले आहे मात्र महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्याचे प्रमाण इतर राज्यांपेक्षा अधिक असल्याने हा एक मोठा चिंतेचा विषय असल्याचे सांगितले जात आहे. राज्यात सर्वात जास्त विदर्भातील अमरावती (Amravati) जिल्ह्यात शेतकरी आत्महत्त्यांचे प्रमाण असल्याचे सांगितले जात आहे.

Updated on 09 February, 2022 5:24 PM IST

भारत एक कृषिप्रधान देश (Agricultural country) आहे आणि या कृषिप्रधान देशातच शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिवसेंदिवस वाढत आहेत. जगाचा पालन पोषण करणारा शेतकरी राजा कर्जापोटी तसेच इतर अनेक कारणांमुळे आत्महत्या करण्यास विवश होतो. देशात सर्वत्र शेतकरी आत्महत्याचे (Farmer suicide) प्रमाण वाढले आहे मात्र महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्याचे प्रमाण इतर राज्यांपेक्षा अधिक असल्याने हा एक मोठा चिंतेचा विषय असल्याचे सांगितले जात आहे. राज्यात सर्वात जास्त विदर्भातील अमरावती (Amravati) जिल्ह्यात शेतकरी आत्महत्त्यांचे प्रमाण असल्याचे सांगितले जात आहे.

याबाबत नुकतीच एक आकडेवारी समोर आली आहे त्यामुळे अमरावतीमध्ये घडतं असणाऱ्या शेतकरी आत्महत्या काळीज पिळवटून टाकणाऱ्या असल्याच्या भावना समाजाच्या सर्व स्तरांतून व्यक्त केल्या जात आहेत. अमरावती जिल्ह्यात 2021 या वित्तीय वर्षात आत्तापर्यंत सुमारे 361 शेतकऱ्यांनी आपण होऊन आपल्या प्राणाची ज्योत मावळली आहे. 361 आत्महत्यांमध्ये प्रत्येक प्रकरणात वेगवेगळी कारणे आहेत तर काही कारणे अद्यापही पोलिसांना ठाऊक नाहीत. 2021 या आर्थिक वर्षात झालेल्या 361 आत्महत्या पैकी 226 शेतकऱ्यांनी खरंच आत्महत्या केल्याचे सिद्ध झाले आहे. तर 75 शेतकऱ्यांच्या आत्महत्या या अपात्र ठरविण्यात आल्या आहेत, तसेच 60 शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे कारण अद्यापही पोलिसांना ज्ञात झालेले नाहीये. 2021 च्या ऑगस्ट महिन्यात सर्वात जास्त आत्महत्या झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यात तसेच राज्यात वाढणाऱ्या शेतकरी आत्महत्या कधी संपुष्टात येतील हा एक मोठा प्रश्न यावेळी उपस्थित केला जात आहे. बळीराजा संपूर्ण जगाचे पालनपोषण करत असतो मात्र स्वतःचे पालन पोषण करण्यास परिवाराचा, उदरनिर्वाह भागविण्यास बळीराजा अपुरा पडत असल्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे अनेक जाणकार स्पष्ट करतात.

जिल्ह्यात शेतकरी वेगवेगळ्या कारणांनी आत्महत्या करताहेत, यामध्ये प्रामुख्याने सावकारी कर्ज अथवा बँकेचे कर्ज, आजारपण त्यामुळे होणारा खर्च याला कंटाळून,बेरोजगारी तसेच परिवारातील अंतर्गत कलह या कारणामुळे जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या जास्त झाल्याचे उघडकीस आले आहे. जिल्ह्यात 2021 या आर्थिक वर्षात 361 आत्महत्या झाल्या त्यापैकी काही आत्महत्या, आत्महत्या नसल्याचा पोलिसांना संशय आहे या प्रकरणात पोलीस सखोल चौकशी देखील करत आहेत. त्यापैकी काही आत्महत्या अपात्र ठरविण्यात आल्या आहेत तर काही आत्महत्यांचा अद्यापही शोध तपास घेणे पोलिसांद्वारे सुरु आहे. मागील वर्षी सर्वात जास्त ऑगस्ट महिन्यात आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. ऑगस्टमध्ये जवळपास 42 शेतकर्‍यांनी आपली जीवनयात्रा संपवली.

या आत्महत्यामध्ये 30 शेतकऱ्यांच्या आत्महत्या पात्र ठरवल्या गेल्या आहेत तर 8 आत्महत्या अपात्र ठरवल्या आहेत तसेच चार आत्महत्यांवर अजूनही पोलिसांद्वारे शोध तपास घेणे तसेच सखोल चौकशी करणे सुरू आहे. या नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच जानेवारी महिन्यात जवळपास 22 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. या 22 शेतकऱ्यांच्या आत्महत्येची चौकशी अद्याप सुरू आहे. एकंदरीत कृषिप्रधान देशात घडत असलेल्या शेतकरी आत्महत्या मोठा चर्चेचा विषय बनत चालला आहे आणि यावर मायबाप सरकारने वेळीच लक्ष घालून योग्य त्या उपाययोजना करणे अपरिहार्य आहे, नाहीतर जगाचे पालन पोषण करणारा बळीराजा एक दिवस संपेल असे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे.

English Summary: The number of farmers committing suicide in Amravati district is alarming
Published on: 09 February 2022, 05:24 IST