News

मुरलीधर मोहोळ यांनी सहकारिता मंत्रालयाच्या राज्यमंत्री पदाचा स्वीकारला पदभार- श्री. मुरलीधर मोहोळ यांनी सहकारिता मंत्रालयाच्या राज्यमंत्रिपदाची जबाबदारी आज स्विकारली. पदभार स्विकारण्यापूर्वी त्यांनी सहकारिता मंत्री अमित शाह यांची भेट घेतली आणि त्यांचे मार्गदर्शन व आशीर्वाद घेतला. ‘विकसित भारत’ संकल्पनेच्या पूर्ततेसाठी सहकारिता मंत्रालय महत्वपूर्ण भूमिका निभावेल, असा विश्वास मोहोळ यांनी यावेळी व्यक्त केला.

Updated on 13 June, 2024 1:43 PM IST

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील चार नवनिर्वाचित खासदारांनी केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्री पदावर सोपविलेल्या खात्यांचा कार्यभार आज स्विकारला. या मंत्र्यांमध्ये रामदास आठवले, प्रतापराव जाधव, श्रीमती रक्षा खडसे आणि मुरलीधर मोहोळ यांचा समावेश आहे.

मुरलीधर मोहोळ यांनी सहकारिता मंत्रालयाच्या राज्यमंत्री पदाचा स्वीकारला पदभार- श्री. मुरलीधर मोहोळ यांनी सहकारिता मंत्रालयाच्या राज्यमंत्रिपदाची जबाबदारी आज स्विकारली. पदभार स्विकारण्यापूर्वी त्यांनी सहकारिता मंत्री अमित शाह यांची भेट घेतली आणि त्यांचे मार्गदर्शन व आशीर्वाद घेतला. ‘विकसित भारत’ संकल्पनेच्या पूर्ततेसाठी सहकारिता मंत्रालय महत्वपूर्ण भूमिका निभावेल, असा विश्वास मोहोळ यांनी यावेळी व्यक्त केला.

रक्षा खडसे: क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रालयाच्या राज्यमंत्री पदाचा स्वीकारला पदभार-श्रीमती रक्षा खडसे यांनी केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाच्या राज्यमंत्री पदाचा कार्यभार आज स्विकारला. त्या सलग तिसऱ्यांदा लोकसभेवर निवडून आलेल्या असून, महाराष्ट्रातील एकमेव महिला मंत्री म्हणून त्यांच्या कार्याची विशेष नोंद आहे.

रामदास आठवले: सामाजिक न्याय मंत्रालयाच्या राज्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेतली-श्री. रामदास आठवले यांनी सामाजिक न्याय मंत्रालयाच्या राज्यमंत्रिपदाची जबाबदारी आज स्विकारली. त्यांनी सामाजिक न्याय क्षेत्रात नव्या संधी निर्माण करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त केला.

प्रतापराव जाधव: केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या राज्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला श्री. प्रतापराव जाधव यांनी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या राज्यमंत्री पदाचा पदभार आज स्विकारला. पदभार स्वीकारतांना त्यांनी औषधीय वनस्पती रोपण करून आरोग्य क्षेत्रात नव्या कल्पनांचा प्रारंभ केला.

नवनिर्वाचित मंत्र्यांनी त्यांच्या-त्यांच्या खात्यांचा पदभार स्विकारल्यानंतर महाराष्ट्राच्या विकासात महत्वपूर्ण योगदान देण्याचा संकल्प करण्याचा निर्धार व्यक्त केला.

English Summary: The newly elected MPs of Maharashtra took charge of the post of Union Minister of State
Published on: 13 June 2024, 01:43 IST