राज्यातील काही भागांमध्ये थंडीची लाटकायम आहे. परंतु असे असेल तरी येत्या काही दिवसांमध्ये राज्यातील काही भागात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
राज्यातील उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात थंडी कायम आहे. 2 फेब्रुवारी पर्यंत या भागात थंडी कायम राहणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.तर 3 फेब्रुवारीपासून पावसाची शक्यता आहे, असेही हवामानखात्या कडून काही स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून राज्यातील थंडीचा जोर कमी होणार आहे. राज्यातील धुळे येथे 4.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.तर नंदुरबारच्या सातपुड्याच्या डोंगरांमध्ये पारा10 अंशाच्या खाली आला आहे.
राज्यातील प्रमुख शहरातील तापमान
नागपूर 7.9 अंश सेल्सिअस, नाशिक 8.4 अंश सेल्सिअस, गोंदिया 7.8 अंश सेल्सिअस,मालेगाव 8.6 अंश सेल्सिअस,औरंगाबाद 9.2 अंश सेल्सिअस,नांदेड 9.6 अंश सेल्सिअस, अकोला 10.1 अंश सेल्सिअस, परभणी 10.5 अंश सेल्सिअस णि सोलापूर 11 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
Published on: 01 February 2022, 10:22 IST