शेतीमालाचे उत्पादन किती निघाले आहे हे बघण्यापेक्षा त्या मालाचे सरंक्षण कसे करायचे हे महत्वाचे ठरले आहे. कारण मागील खरीप हंगामात निसर्गाचा अनियमितपणा शेतकऱ्याना चांगलाच भोवला आहे. मागे पडणारा सततचा पाऊस त्यामुळे पिकांवर तर विपरीत परिणाम झालाच तसेच उत्पादनात सुद्धा घट झाली. सध्या रब्बी हंगामातील पहिल्या पेऱ्याच्या हरभऱ्याची काढणी सुरू आहे तर दुसऱ्या बाजूला हवामान बदलाचे संकेत दिले जात आहेत त्यामुळे काढणीला सुरुवात केली आहे तसेच लागातच राशीला सुद्धा सुरुवात केली जाणार आहे म्हणजे रखडलेली कामे मार्गी लागतील व उत्पादनाचा धोका टळेल. उस्मानाबाद जिल्ह्यात पोषक वातावरण झाले असल्याने पहिल्या टप्यातील पेरणी ची कामे सुरू केली आहेत.
उत्पादन पदरी पडावे म्हणून शेतकऱ्यांची धडपड :-
निसर्गाच्या लहरीपणामुळे खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झालेच आहे पण या रब्बी हंगामातील पिकांमधून तरी उत्पन्न निघावे अशी अपेक्षा शेतकऱ्यांच्या आहे. अवकाळी पाऊस, गारपीठ याचा सामना ही शेतकऱ्यांना करावा लागला आहे जे की अजूनही हवामान खात्याने वातावरण बदलण्याचे संकेत दिले आहे त्यामुळे शेतकरी आता यापासून सावधान झाले आहे आणि त्यांनी लगेच काढणीला सुरुवात केली आहे. काढणी सुरू असताना लागलीच शेतकऱ्यांनी राशी ला सुद्धा सुरुवात केली आहे त्यामुळे होणारे नुकसान टळले जाईल.
पुन्हा ढगाळ वातारवरण :-
मागे झालेल्या अवकाळी पाऊस तसेच गारपीठ नंतर मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार झाले आहे. या ढगाळ वातावरणामुळे पिकांना तर धोका आहेच मात्र ज्या पिकांची काढणी झाली आहे व राशी झाली नाही तर जास्त नुकसान होणार आहे. सकाळी थंडी आणि नंतर दिवसभर ढगाळ वातावरण असल्याने रब्बीमध्ये चिंता वाढतेच आणि यामध्ये वातावरण बदलाचे संकेत दिल्यामुळे शेतकरी सावधान झाले आहेत.
बाजारपेठेपेक्षा हमीभाव केंद्रावरच भर :-
जसे तूर पिकासाठी हमीभावकेंद्र उभारण्यात आले त्याचप्रमाणे हरभऱ्याला सुद्धा हमीभाव केंद्र उभारण्यात आले आहेत. बाजारामध्ये असणारे दर आणि हमीभाव केंद्राच्या दरात जवळपास ७०० रुपयांचा फरक आहे त्यामुळे शेतकरी हमीभाव केंद्राचाच आधार घेत आहेत. बाजारात प्रति क्विंटल २-३ हजार रुपये दिले जातायत तर हमीभाव केंद्राचा दर ५ हजार २३० रुपये एवढा आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी हमीभाव केंद्रावर भर दिला आहे.
Published on: 10 February 2022, 06:47 IST