News

राज्यातील करोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने मुखपट्टीची सक्ती ऐच्छिक करण्यात आली होती पण आता परत रुग्ण वाढू लागले आहेत, त्यामुळे पुन्ह मास्क सक्ती करावी अशी आशा वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांकडून करण्यात येत आहे. मुखपट्टी वापराची सक्ती करावी, अशी सूचना तज्ञ समितीने केली शासनाला केली होती. पण अजून मुखपट्टी वापराची सक्ती करायची नाही, अशी भूमिका मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आली.

Updated on 29 April, 2022 5:30 PM IST

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने मुखपट्टीची सक्ती ऐच्छिक करण्यात आली होती पण आता परत रुग्ण वाढू लागले आहेत, त्यामुळे पुन्ह मास्क सक्ती करावी अशी आशा वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांकडून करण्यात येत आहे. मुखपट्टी वापराची सक्ती करावी, अशी सूचना तज्ञ समितीने केली शासनाला केली होती. पण अजून मुखपट्टी वापराची सक्ती करायची नाही, अशी भूमिका मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आली.

राजेश टोपे यांनी सांगितले की सध्या तरी मास्क सक्ती करण्यात येणार नाही असा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत झाला आहे. जून मध्ये चौथी लाट येण्याची शक्यता असल्यामुळे जास्तीत जास्त लसीकरण वाढविण्यावर भर देण्याच्या सूचना सार्वजनिक आरोग्य विभागाला मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिल्या.

दिल्ली, उत्तर प्रदेश, कर्नाटकसह काही राज्यांमध्ये मुखपट्टी वापराची सक्ती पुन्हा करण्यात आली. महाराष्ट्रातही अशाच प्रकारे सक्ती करावी, असा वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांचा सूर आहे. कोरोना कृती दलाने गर्दीच्या ठिकाणी, सिनेमागृहे किंवा बंदिस्त सभागृहांमध्ये मुखपट्टी सक्ती करावी, याची शिफारस केली आहे.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत करोना परिस्थितीबाबत चर्चा करण्यात आली. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या सोबत झालेल्या चर्चेचा अहवाल या बैठकीत मांडला. सरकारने मुखपट्टी सक्तीचे बंधन मागे घेतले असून पुन्हा सक्ती केल्यास त्याची नागरिकांमध्ये प्रतक्रिया उमटेल. यामुळेच  रुग्णसंख्येत वाढ झाल्यास मुखपट्टीसक्तीबाबत विचार केला जाईल, असे सांगण्यात आले.

आरोग्य तज्ञांनी व संशोधकांनी करोनाच्या चौथ्या लाटेची शक्यता वर्तविली आहे, राज्यात करोना रुग्णसंख्या नियंत्रणात असल्याने भीतीचे कोणतेही कारण नसल्याचे टोपे यांनी म्हटले आहे. अन्य देश व राज्यातील कोरोना परिस्थती लक्षात घेता गर्दीच्या ठिकाणी मुखपट्टी वापराची सक्ती पुन्हा लागू करण्याची सूचना डॉक्टरांच्या कृती गटाने राज्य सरकारला केली होती पण राज्य सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे त्यामुळे सध्या तरी मास्क सक्ती नसल्याचे टोपे यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या
DAP Fertilizer Price 2022: खतांच्या वाढत्या किमतींनी शेतकऱ्यांना धक्का, जाणून घ्या सरकारी आकडेवारी
ऊस उत्पादकांसाठी महत्त्वाचे! ऊस पिकातील सूक्ष्म अन्नद्रव्यांचे कार्य आणि त्यांच्या कमतरतेची लक्षणे

English Summary: The mask is not forced; However, Chief Minister Thackeray's suggestion to increase vaccination
Published on: 29 April 2022, 05:30 IST