इंदापूरमध्ये सध्या ऊस दरासाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत. भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या ताब्यातील साखर कारखान्याच्या विरोधात पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक आणि इंदापूर बाजार समितीचे माजी सभापती आप्पासाहेब जगदाळे यांनी आंदोलन सुरू केले आहे.
यामध्ये आज मोठ्या प्रमाणावर शेतकरी सहभागी झाले होते. यावेळी शेतकऱ्यांना गेटवरच अडवण्यात आले आहे. ऊस बिलाच्या मागणीसाठी काढण्यात आलेल्या मागणीसाठी मोर्चाला पोलीस प्रशासनाने कारखान्याकडे जाणाऱ्या चौकात अडवले आहे.
यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी शेतकऱ्यांनी मोठ्या घोषणा दिल्या. हर्षवर्धन पाटलांच करायचं काय, खाली मुंड वर पाय, जय जवान जय किसान, अशा घोषणा यावेळी शेतकऱ्यांनी दिल्या.
16 गोणी कांदा, पट्टी लागली 71 रुपये, कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी...
यावेळी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दरम्यान, इंदापूर तालुक्यातील नीरा भीमा आणि कर्मयोगी साखर कारखान्याने गाळप झालेल्या उसाचे बिल वेळेत न दिल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
KJ Chaupal मध्ये भारत आणि ब्राझीलमधील सहकार्य आणि सांस्कृतिक संबंधावर चर्चा
शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने निरा भिमा कारखाना येथे आत्मक्लेश आंदोलन करण्यात येणार आहे, असे जगदाळे यांनी सांगितले. यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
तेलंगणामध्ये सरकार करणार हमीभावाने ज्वारीची खरेदी, शेतकऱ्यांना मोठा दिलासा...
शेतकऱ्याने आंब्याला दिले शरद पवारांच नाव! कारणही सांगितलं...
यंदा दुष्काळ पडणार? हवामान खात्याने दिला इशारा..
Published on: 17 May 2023, 03:10 IST