News

संपूर्ण भारतभर गुरांच्या दुधाची उत्पादकता लक्षात घेण्याकरिता, कारगिल कंपनीने दुधाळ जनावरांच्या आरोग्यासाठी आणि पोषण खाद्य पुरवठा करण्यासाठी महाराष्ट्रातील कुरकुंभ येथे उच्च-दाब हायड्रोजनेशन प्लांट सुरु केला आहे.

Updated on 18 August, 2020 6:13 PM IST


संपूर्ण भारतभर गुरांच्या दुधाची उत्पादकता लक्षात घेण्याकरिता, कारगिल कंपनीने दुधाळ जनावरांच्या आरोग्यासाठी आणि पोषण खाद्य पुरवठा करण्यासाठी  महाराष्ट्रातील कुरकुंभ येथे उच्च-दाब हायड्रोजनेशन प्लांट सुरु केला आहे. कंपनीने म्हटले आहे की, येणाऱ्या दोन दशकात भारत जगातील सर्वाधिक दूध उत्पादक देश बनेल. जगातील सरासरीच्या तुलनेत भारतात प्रति प्राणी दुधाची उत्पादकता कमी आहे. भारतामध्ये दुधाचे उत्पादन वाढविणे हे या कंपनीचे मुख्य प्राधान्य आहे. यामुळे इतर देशाशी स्पर्धा करणे सोपे जाणार आहे.

तंत्रज्ञानदृष्ट्या प्रगत असलेल्या जागतिक ब्रॅण्ड कॅरफेच्या अंतर्गत हे उत्पादन बाजारात आणले जाईल, जेणेकरून गुरांना चांगले खाद्य पुरवठा होईल आणि अधिक ऊर्जा मिळेल. कॅफेने दुग्धशाळेच्या पोषण आहाराची गुणवत्ता याआधीच सिद्ध केली आहे. परिणामी दुधाचे उत्पादन जास्त  होईल, ज्यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.  कॅफेच्या अंतर्गत उत्पादन जगातील विकसित दुग्धशाळेच्या बाजारात आधीपासूनच उपलब्ध आहे आणि आता ते स्थानिक पातळीवर जसे महाराष्ट्रातील कुरकुंभमधील कारगिलच्या नवीन बायोइंडस्ट्रियल प्लांटमध्ये तयार केले जाईल. भारतातील दुग्धशाळेतील शेतकरी आणि खाद्य उत्पादकांना उपलब्ध करून दिले जाईल.

कारगिलच्या बायोइंडस्ट्रिअल व्यवसायामध्ये पेंट, शाई आणि कोटिंग्ज उद्योगातील पेंट, डिस्टील्ड फॅटी सिडस् यासह टिकाऊ जैव-आधारित उत्पादने यांची मोठी यादी आहे .  महाराष्ट्रातील गुंतवणुकीमुळे कारगिल बायो इंडस्ट्रिअल क्षेत्रात स्थानिक पातळीवर आपली उपस्थिती वाढवत आहे, जे जागतिक स्तरावर वाढीच्या संधींना पाठबळ देत आहेत.

English Summary: The Kargil Company has set up an animal feed plant in the state
Published on: 18 August 2020, 06:13 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)