News

राज्यात मोठ्या प्रमाणात कांद्याचे पीक घेतले जाते. रायगडच्या अलिबाग तालुक्यात मात्र पांढऱ्या कांद्याचे उत्पादन घेतले जाते. पांढऱ्या कांद्याचे उत्पादन हे केवळ अलिबाग जिल्ह्यातच नजरेस पडते. मात्र या अलिबाग जिल्ह्यातील पांढर्‍या सोन्याला बदलत्या वातावरणाचा मोठा फटका बसत आहे. वातावरणातील विपरीत बदलामुळे अलिबागच्या या पांढर्‍या कांद्याच्या उत्पादनात मोठी घट घडून येत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. त्यामुळे अलिबाग जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे.

Updated on 29 January, 2022 5:18 PM IST

अलिबागच्या पांढऱ्या कांद्याला जीआय टॅग प्राप्त आहे. त्यामुळे या कांद्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. पांढऱ्या कांद्यामध्ये आढळणारे औषधी गुणधर्ममुळे याची मोठी मागणी बाजारात सदैव बनलेली असते. मात्र या औषधी गुणांनी युक्त पांढऱ्या कांद्यावर बदलत्या वातावरणाचा विपरीत परिणाम घडत आहे, सध्या अलिबाग समवेत संपूर्ण राज्यात ढगाळ हवामान व दाट धुके बघायला मिळत आहे यामुळे पांढऱ्या कांद्याची पात पिवळी पडत असल्याचे सांगितले जात आहे. या बदलत्या वातावरणामुळे पांढरा कांदा पोसला जात नसून येथील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना छोटा कांदा काढणी करावा लागत आहे. सध्या जिल्ह्यात सर्वत्र पांढरा कांदा काढण्यासाठी शेतकरी बांधव लगबग करत आहेत, मात्र बदललेल्या वातावरणामुळे या कांद्याच्या उत्पादनात उल्लेखनीय घट होत असल्याचे सांगितले जात आहे.

अलिबाग तालुक्यात सर्वत्र पांढरा कांदा नजरेस पडतो, या तालुक्यातील बहुतांश शेतकरी भात आणि पांढरा कांदा पिकावर अवलंबून असतात. त्यामुळे पांढरा कांद्याच्या उत्पादनात घट घडल्याने येथील शेतकऱ्यांच्या अर्थकारणावर याचा विपरीत परिणाम घडणार असल्याचे सांगितले जात आहे. तालुक्यात जवळपास तीनशे हेक्टर क्षेत्रावर पांढरा कांदा लावला गेला आहे, या एवढ्या मोठ्या क्षेत्रावरील पांढरा कांदा बदललेल्या वातावरणामुळे संकटात सापडला आहे. तालुक्यातील जवळपास बारा गावांमध्ये पांढऱ्या कांद्याचे उत्पादन घेतले जाते. त्यामुळे या गावातील शेतकरी कांद्याच्या उत्पादनात झालेल्या घसरणी मुळे पुरता मेटाकुटीला आल्याचे चित्र बघायला मिळत आहे.

मागील दोन वर्षे कोरोनाव्हायरस मुळे पांढरा कांदा उत्पादित होऊन देखील शेतकऱ्यांना विक्री करण्यासाठी अडथळे येत होते. त्यामुळे आधीच बेजार झालेला शेतकरी या हंगामात बदललेल्या वातावरणामुळे झालेल्या नुकसानीने पुरता मेटाकुटीला आला आहे. खरीप हंगामातील भात पिकानंतर हिवाळ्यात पांढरा कांदा लागवड करून येथील शेतकरी बांधव आपला व आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह भागवत असतात. मात्र आता पांढऱ्या कांद्याच्या उत्पादनात घट झाली असल्याने येथील शेतकऱ्यांच्या कुटुंबावर दुःखाचे सावट नजरेस पडत आहे.

English Summary: The impact of the changing climate on white onions; as a decrease in production.
Published on: 29 January 2022, 05:18 IST