News

राज्यात सर्वात जास्त कांदा पश्चिम महाराष्ट्रात (Western Maharashtra) उत्पादित केला जातो. गेल्या अनेक वर्षांपासून येथील कांदा उत्पादक शेतकरी कांदा या नगदी पिकातून (Cash crop) चांगले उत्पन्न अर्जित करत आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांचे सर्व अर्थकारण कांदा पिकावर अवलंबून असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.

Updated on 02 February, 2022 10:03 PM IST

राज्यात सर्वात जास्त कांदा पश्चिम महाराष्ट्रात (Western Maharashtra) उत्पादित केला जातो. गेल्या अनेक वर्षांपासून येथील कांदा उत्पादक शेतकरी कांदा या नगदी पिकातून (Cash crop) चांगले उत्पन्न अर्जित करत आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांचे सर्व अर्थकारण कांदा पिकावर अवलंबून असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.

नुकत्याच काही दिवसांपूर्वी सोलापूर बाजार समिती (Solapur Market Committee) मध्ये होत असलेल्या प्रचंड आवकेमुळे सोलापूर बाजार समिती देशातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ म्हणून नावारुपाला आली आहे. यामुळे महाराष्ट्राच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला गेल्याचे सांगितले जात आहे. सोलापूर बाजार समितीत होत असलेली विक्रमी आवक महाराष्ट्राला प्रमुख कांदा उत्पादक राज्य (Major onion producing states) बनवत आहे. आता पश्चिम महाराष्ट्रातीलपुणे जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत कांदा दाखल होऊ लागला आहे. पुण्याच्या आळेफाटा उपबाजारात (Alephata sub-market) सध्या मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.

मंगळवारी आळेफाटा उपबाजारात जवळपास 33 हजार गोणी कांदा विक्रीसाठी आल्याचे बाजार समितीकडून समजत आहे. एवढी प्रचंड आवक असतानादेखील बाजारपेठेत कांद्याला समाधानकारक बाजार भाव प्राप्त झाला, मंगळवारी बाजारपेठेत कांद्याला जवळपास तीन हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत सरासरी दर प्राप्त होत असल्याचे सांगितले गेले. बाजारपेठ मिळत असलेल्या दरामुळे शेतकरी बांधवांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. गेल्या दीड महिन्यापासून आळेफाटा उपबाजारात कांद्याची विक्रमी आवक होत असल्याचे सांगितले गेले. आळेफाटा बाजारपेठेत कांद्याच्या विक्रमी खरेदी विक्री मुळे कोट्यावधींची उलाढाल होत असल्याचे सांगितले जात आहे.

या बाजारपेठेतील कांदा देशात जवळपास सर्वत्र विकला जात असून येथील कांद्याला मोठी मागणी असल्याचे सांगितले जात आहे. या उपबाजारात मंगळवार शुक्रवार आणि रविवार या तीनच दिवस कांद्याचे लिलाव होत असतात. उपबाजारात 21 जानेवारीला या हंगामातील सर्वात जास्त आवक नमूद करण्यात आली. या दिवशी बाजारपेठेत जवळपास 30 हजार शंभर गोणी कांद्याची आवक झाल्याचे सांगितले गेले होते. बाजारपेठेत आवक मध्ये वाढ तर होतच आहे याशिवाय गेल्या दीड महिन्यापासून बाजारपेठेत कांद्याचे बाजार भाव देखील स्थिर आहेत, बाजारपेठेतील या चित्रामुळे कांदा उत्पादक शेतकरी समाधानी असल्याचे समजत आहे.

English Summary: The high inflow of onions into the 'Ya' market committee; Market prices are also satisfactory
Published on: 02 February 2022, 10:03 IST