News

मागील दोन दिवसांपूर्वी पोलिसांकडून जालन्यातील आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला. यामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली. तसंच राज्यभरात ठिकठिकाणी बंद पाळण्यात आला. या घटनेमुळे अडीच हजार आंदोलकावरती गुन्हे दाखल झालेले आहेत.

Updated on 06 September, 2023 11:01 AM IST

Jalna News :

मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांची नवव्या दिवशी खालावली आहे. जरांगे यांची तपासणी करण्यासाठी डॉक्टर आल्यानंतर त्यांना सलाईन लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जरांगेंची तबेत खालावल्याची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी आज उपोषणस्थळी जाऊन जरांगे यांची विचारपूस केली. तसेच सुरक्षेचा आढावा देखील घेतला आहे.

आरक्षणासाठी उपोषणा बसलेल्या मनोज जरांगे यांची तबेत कालपासून खालवण्यास सुरुवात झाली आहे. त्यांच्या शरीरामधील पाणी आणि शुगर पातळी सुद्धा कमी झाले आहे. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना आता सलाईन लावण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच आंदोलन स्थळी आता मराठा समाजाच्या कार्यकर्ते देखील मोठ्या प्रमाणात गर्दी करु लागले आहेत.

मागील दोन दिवसांपूर्वी पोलिसांकडून जालन्यातील आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला. यामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली. तसंच राज्यभरात ठिकठिकाणी बंद पाळण्यात आला. या घटनेमुळे अडीच हजार आंदोलकावरती गुन्हे दाखल झालेले आहेत. काही मराठा कार्यकर्त्यांनी स्वत:ची वाहने पेटवून सरकारचा निषेध केला आहे.

दरम्यान, २९ ऑगस्टपासून पैठण फाटा येथे मनोज जरांगेनी आंदोलनाची हाक दिली आहे. तेव्हापासून जरांगे उपोषणावर ठाम आहे. तसंच आता त्यांची प्रकृती खालावत असल्यामुळे आंदोलकांना देखील त्यांची काळजी वाटू लागली आहे. जर त्यांना त्रास झाला तर त्याला सर्वस्वी सरकार जबाबदार राहील, असं आंदोलकांनाकडून सांगण्यात येत आहे.

English Summary: The health of Manoj Jarang who was on hunger strike for Maratha reservation, deteriorated
Published on: 06 September 2023, 11:00 IST