News

यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे सगळ्याच पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्याला कापूसही अपवाद नाही. मध्य प्रदेश,गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये झालेल्या पावसामुळे यंदा कापूस उत्पादनात कमालीची घट येण्याची शक्यता आहे.तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर विचार केला तर कापसाची मागणी वाढणार असल्याने दरही तेजीत राहतील, असा अंदाज जुनागड कृषी विद्यापीठाने कापूस दर अंदाज अहवालात स्पष्ट केला आहे.

Updated on 24 October, 2021 10:17 AM IST

 यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे सगळ्याच पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्याला कापूसही अपवाद नाही. मध्य प्रदेश,गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये झालेल्या पावसामुळे यंदा कापूस उत्पादनात कमालीची घट येण्याची शक्यता आहे.तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर विचार केला तर कापसाची मागणी वाढणार असल्याने दरही तेजीत राहतील, असा अंदाज जुनागड कृषी विद्यापीठाने कापूस दर अंदाज अहवालात स्पष्ट केला आहे.

 या अहवालात म्हटले आहे की, देशात कापूस उत्पादन कमालीचे घटनार आहे. मागच्या वर्षी चा विचार केला तर देशात 131 लाख हेक्‍टर कापूस लागवड होती.यंदा कापूस लागवड जास्त असलेल्या भागात पावसाचा खंड, कमी पाऊस इत्यादी कारणांमुळे  मागच्या वर्षीच्या तुलनेत कपाशीचे लागवड क्षेत्र 124 लाख हेक्‍टरवर आले आहे. अगोदरच लागवड क्षेत्रात घट आणि त्यातच पावसाने केलेले कपाशी पिकाचे नुकसान यामुळे कापूस उत्पादनात घट येईल असे अहवालात नमूद करण्यात आली आहे. 

गुजरात राज्याचा विचार केला तर मागच्या वर्षीच्या तुलनेत याहीवर्षी 22.56 लाख हेक्‍टरवर कापूस लागवड झाल्यामुळे गुजरात राज्यातील कापूस उत्पादन स्थिर राहील असे अहवालात म्हटले आहे.तसेच80.95 लाख गाठी कापूस उत्पादनाचा अंदाज सरकारने व्यक्त केला. मागच्या वर्षी 72.7 लाख गाठी कापूस उत्पादन होते. यावर्षी यामध्ये आठ लाख गाठींची वाढ सरकारला अपेक्षित आहे.

 कापसाच्या भावा बद्दल जुनागड कृषी विद्यापीठाने म्हटले की, या वर्षी सरकारने लांब धाग्याच्या कापसासाठी सहा हजार पंचवीस रुपये हमीभाव जाहीर केला आहे. 

मात्र जागतिक कापूस मागणी वाढल्याने दर आला असलेला आधार आणि देशात कमालीचे कापूस उत्पादन घटणार असल्याने दर हमीभावापेक्षा जास्तच राहतील. यामध्ये कापूस निर्यातीच्या संधी आणखी वाढल्या आणि जागतिक कापूस वापर असा चांगला राहिला तर पुढील काळात दर वाढण्याची दाट शक्यता आहे.( संदर्भ- ॲग्रोवन)

English Summary: the guess of junagarh krushi vidyapith is cotton rate this year is increase
Published on: 24 October 2021, 10:17 IST