काळाच्या बदलत नागरिकांनी ऑनलाइन व्यवहार करणे स्वीकारले आहे. ऑनलाईन व्यवहार जेवढे सोपे आहेत तेवढेच धोक्याचे देखील आहेत. नाशिक जिल्ह्यात सध्या द्राक्षाची तोडणी सुरू आहे जे की तिथे सुद्धा पैशाची देवाण घेवाण ऑनलाइन पद्धतीने चालू आहे. ऑनलाइन व्यवहार किती धोक्याचा आहे ते सांगली जिल्ह्यातील खानापूर येथील चार द्राक्षे उत्पादकांना आला आहे. या चार शेतकऱ्याची जवळपास ९ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. या चार शेतकऱ्यांच्या द्राक्षाची किमंत ११ लाख रुपये झाली होती जे की व्यापाऱ्याने २ लाख रक्कम हातात दिली आणि ९ लाख ऑनलाइन पाठवीन असे सांगितले. दत्तात्रय तुकाराम शिंदे, संभाजी महादेव जाधव, नेताजी दगडू जाधव, जयदीप सुरेश जाधव या चार शेतकऱ्याना उंब्रज मधील विजय बाळासाहेब तांबवे व सुरज बंडगर या दोघांनी फसवले आहे.
शेतकऱ्यांनो व्यवहार करताना ही घ्या काळजी :-
शेतीमालाच्या उत्पादकतेच्या दरापेक्षा बाजारात जे दर आहेत त्यास महत्व देणे गरजेचे आहे. बाजारात जर व्यवहार असतील तरच शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहेत. शेतकऱ्यांनी व्यापारी वर्गाशी व्यवहार करताना तोंडी व्यवहार न करता लेखी व्यवहार करावेत. या लेखी व्यवहारात द्राक्षचा दर तसेच वाण या गोष्टींचा उल्लेख होणे गरजेचे आहे. तसेच त्या व्यापाऱ्याचे नाव, आधारकार्ड, मोबाईल नंबर याची अचूक नोंदणी करने गरजेचे आहे.
अशी होते फसवणूक :-
जो पर्यंत द्राक्षाची खरेदी होत नाही तो पर्यंत शेतकऱ्याशी व्यवहार चोख केला जातो. एकदा की माल हाती घेतला की राहिलेले पैसे यावेळी देईन किंवा ऑनलाइन पाठवतो असे सांगितले जाते. एकदा व्यापारी माल घेऊन गेला की नंतर तो शेतकऱ्याकडे दुर्लक्ष करण्यास चालू करतो. हाच प्रकार नाशिक तसेच सांगली जिल्ह्यात घडत आहे. शेतकऱ्यानी याबाबत तक्रार नोंदवली असून जो पर्यंत हाती पुरावा लागत नाही तो पर्यंत कारवाई केली जाऊ शकत नाही.
द्राक्ष उत्पादक संघाचे काय आहे आवाहन :-
द्राक्ष उत्पादक संघाने शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये म्हणून एक सौदे पावती छापली आहे जे की द्राक्षे उत्पादकांपर्यंत ही पावती पोहचली सुद्धा आहे. परंतु पाहिजे तेवढ्या प्रमाणत याचा वापर शेतकरी करत नाहीत. या सौदे पावतीवर शेतकऱ्याचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर, गट नंबर, आधार नंबर याचा उल्लेख आहे तर खरेदीदाराचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर, आधार नंबर, पॅक हाऊस पत्ता, पॅन नंबर, परवाना क्रमांक तसेच सौदयाचे स्वरूपात द्राक्ष वाणाचे नाव, ठरलेला भाव प्रतिकिलो, द्राक्ष तोडणीची तारीख, गाडी नंबर, वजन, एकूण रक्कम आणि पेमेंट देण्याची तारीख याचा उल्लेख आहे. अशा प्रकारे शेतकऱ्यांनी माहिती भरून घ्यावी असे संघाचे संचालक अॅड. रामनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.
Published on: 25 February 2022, 06:32 IST