सध्या अनेक जनावरांना लम्पि हा स्किन चा आजार होत आहे जे की अनेक शेतकऱ्यांनी या आजारावर उपचार करण्यासाठी खाजगी दवाखान्यातुन जी औषधे आणली आहेत. अशा पशुपालकांनी आता औषधे आणलेला पुरावा म्हणजेच त्याची कागदपत्रे व आलेला सर्व खर्च दाखवून त्यांचा झालेला सर्व खर्च माघारी भेटणार असल्याचे आता सांगितले गेले आहे.
श्री. वीखे पाटील यांनी दिली गावांना भेट :-
कोल्हापुर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील मौजे वडगाव, अतिग्रे या गावांना श्री. विखे-पाटील यांनी स्वतः भेट देऊन ज्या जनावरांना लम्पि हा आजार झाला आहे त्यांची पाहणी केली. त्या नंतर श्री. विखे-पाटील हातकणंगले तहसीलदार कार्यालयात एक बैठक आयोजित करून या विषयावर चर्चा करत होते. या बैठकीमध्ये आमदार प्रकाश आवाडे, राजू आवळे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन अधिकारी विजय पवार, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. वाय. ए. पठाण, , उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात यांच्यासोबत अजून अधिकरी वर्ग हजर होता.
लसीकरणाचे वेगाने काम व्हावे असे आदेश :-
जे की बैठकीत असताना श्री. विखे पाटील म्हणाले की या लम्पि आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या काही उपाय योजनामध्ये आहेत त्यामध्ये जर काही त्रुटी असतील तर त्या दूर करण्याचे प्रयत्न आमच्याकडून केले जातील. कोल्हापूर जिल्ह्यात लम्पि आजारावर जवळपास ९३ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे जे की पशुवैद्यकीय व प्रशासनाने हे केलेले काम खूप कौतुकास्पद आहे. एवढेच नाही तर या लसीकरणात गोकुळ आणि वारणा दूध संघांचे देखील सहकार्य लाभले आहे. जे की लसीकरणाचे काम वेगाने करून पशूंची विशेष काळजी घ्यावी अशी सूचना देखील श्री.विखे पाटील यांनी दिलेली आहे.
पशुसंवर्धनात रिक्तपदे भरणे सुरू :-
पशुसंवर्धन विभागाची रिक्त पदे भरण्याची कार्यवाही देखील करण्यात आली आहे असे सांगून या लम्पि आजारावर उपचार करण्यासाठी एक हजार खाजगी
पशुवैद्यकीयांची नियुक्ती देण्याचे आदेश देखील करण्यात आलेले आहेत. तसेच राज्यामध्ये पशुवैद्यकीय महाविद्यालयामध्ये जे इंटर्नशिप करणारे जे डॉक्टर आहेत त्यांना सेवा घेण्यात आलेल्या आहेत आणि त्यांना सुद्धा फिल्डवर पाठवण्यात आले आहे.
Published on: 29 September 2022, 11:59 IST