News

समितीच्या कार्यकक्षेनुसार खाजगीरीत्या व्यावसायिक कुक्कुटपालन करणारे शेतकरी तसेच कुक्कुट व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांना येणाऱ्या अडचणीच्या संदर्भात शासनाच्या विविध विभागांशी आवश्यक त्या शिफारशी केल्या आहेत.

Updated on 05 November, 2023 2:58 PM IST

Mumbai News : खाजगीरीत्या व्यावसायिक कुक्कुटपालन करणारे शेतकरी तसेच कुक्कुट व्यवसाय करणाऱ्या कंपन्या यांना कुक्कुटपालन व्यवसाय करताना येणाऱ्या अडचणीवर उपाययोजना करण्यासाठी राज्यस्तरीय कुक्कुट समन्वय समितीचे गठन करण्यात आले असून या समितीच्या माध्यमातून कुक्कुटपालन व्यवसायाला गती देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याची माहिती महसूल पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे नुकतीच राज्यस्तरीय कुक्कुट समन्वय समितीची बैठक झाली. त्यावेळी विखे पाटील बोलत होते. यावेळी पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास विभागाचे सचिव तुकाराम मुंडे, पशुसंवर्धन आयुक्त डॉ. हेमंत वसेकर, समन्वय समितीचे सदस्य आणि खाजगी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी मंत्री विखे पाटील म्हणाले की, समितीच्या कार्यकक्षेनुसार खाजगीरीत्या व्यावसायिक कुक्कुटपालन करणारे शेतकरी तसेच कुक्कुट व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांना येणाऱ्या अडचणीच्या संदर्भात शासनाच्या विविध विभागांशी आवश्यक त्या शिफारशी केल्या आहेत.

दरम्यान, ऊर्जा, ग्राम विकास, शालेय शिक्षण आदी विभागांना प्रस्ताव पाठविला आहे. समन्वय समितीमार्फत कुक्कुटपालन व्यवसायाला चालना देण्यासाठी शासनस्तरावर व खाजगीरीत्या संयुक्तपणे प्रयत्न करण्यात येत असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी यावेळी सांगितले.

English Summary: The government is trying to speed up the poultry business Minister Radhakrishna Vikhe Patil
Published on: 05 November 2023, 02:58 IST