News

नवीन व्यवसाय करायचा असेल तर बाजारपेठेचा अभ्यास करावा लागतो. आपल्याला जो व्यवसाय करायचा त्याची बाजारपेठेतील काय स्थिती आहे ते तपासून पाहावे लागते. सगळ्या बारीक सारीक गोष्टीचा अभ्यास करावा लागतो.

Updated on 14 January, 2022 2:31 PM IST

नवीन व्यवसाय करायचा असेल तर बाजारपेठेचा अभ्यास करावा लागतो. आपल्याला जो व्यवसाय करायचा त्याची बाजारपेठेतील काय स्थिती आहे ते तपासून पाहावे लागते. सगळ्या बारीक सारीक गोष्टीचा अभ्यास करावा लागतो. मात्र, आम्ही आज नवीन व्यवसायाबद्दल माहिती देणार आहेत. या व्यवसायाबद्दल तुम्हाला बाजारपेठेचा अभ्यास करावा लागणार नाही. आणि कोणत्या मार्केट रिसर्च करण्याची पण गरज नाही.

आज आम्ही तुम्हाला अशा व्यवसायाबद्दल सांगणार आहोत ज्यामध्ये कधीही मंदी नाही. मंदीच्या काळातही या व्यवसायात मागणीवर फारसा परिणाम होत नाही. हा व्यवसाय म्हणजे, दुग्धव्यवसाय आहे. डेअरी फार्मिंग व्यवसाय आहे. ज्यातून तुम्ही दूध उत्पादन करून भरपूर कमाई करू शकता. यामध्ये शासनाकडून अनुदान मिळत आहे.

योग्य गायींची निवड करावी

जास्त प्रमाणात दूध देणाऱ्या गायींची निवड करावी लागणार आहे. जास्त प्रमाणात दूध देण्यासाठी संकरित गायांची निवड करावी. देशी गायांच्या प्रमाणात संकरीत गाय जास्त दूध देते. सुरुवातीला छोटा आणि नंतर मोठा व्यवसाय सुरु कुरु शकता. याचा फायदा म्हणजे अधिक प्रमाणात दुधाचे उत्पादन होईल. त्यामुळे उत्पन्न वाढेल. काही दिवसांनी तुम्ही गायांची संख्या वाढवू शकता.

व्यवसायासाठी शासनाकडून अनुदान

व्यवसायासाठी शासनाकडून 25 ते 50 टक्के अनुदान आहे. हे अनुदान राज्यानुसार बदलू शकते. प्रत्येक राज्यात काही दूध सहकारी संस्था आहेत, ज्या शेतकऱ्यांना दूध उत्पादनातून उत्पन्न वाढवण्यास मदत करतात. तुम्हालाही दुग्धव्यवसाय करायचा असेल, तर तुमच्या राज्यातील दूध सहकारी संस्थेशी संपर्क करून अधिक माहिती मिळवू शकता.

भरघोस उत्पन्न

जास्त प्रमाणात दूध देण्यासाठी संकरित गायांची निवड करावी. संकरित गाई सरासरी १० ते १२ लिटर दूध दिवसाला देते. १० गायांचे संगोपन केले तर दिवसाला १०० लिटर दूध मिळेल. सरकारी डेअरीवर दूध विकल्यास सुमारे 40 रुपये प्रतिलिटर दर मिळतात, तर जवळपासच्या शहरातील अनेक दुकानांमध्ये किंवा मोठ्या सोसायट्यांमध्ये हे दूध खासगीरीत्या विकल्यास 60 रुपयांपर्यंत दर मिळतो. दोन्हीची सरासरी घेतली तर तुम्ही 50 रुपये लिटरने दूध विकू शकता. अशा प्रकारे १०० लिटर दूध म्हणजे तुमचे रोजचे उत्पन्न ५००० रुपये होईल. म्हणजेच एका महिन्यात १.५ लाख रुपये सहज कमवू शकता.

English Summary: The government helps, start a business and make millions
Published on: 14 January 2022, 02:31 IST