आता कोणाकडे पाहायचं ! अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान ; पण भरपाईसाठी सरकारकडे पैसा नाही

27 September 2020 05:55 PM By: भरत भास्कर जाधव


राज्यात मागील काही दिवसांत झालेल्या पावसाने पिकांचे नुकसान झाले. या नुकसानीचे पंचनामे आठवडाभरात करा, असे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी दिले. पण    अधिकाऱ्यांना फक्त पंचनामेच करावे लागतील. कारण राज्य सरकारकडे पैसा नसल्याचं खुद्द कृषी मंत्री यांनी सांगितले आहे.  ही वस्तुस्थिती असल्याचे कबूल करत पैसे उभा करु, असेही भुसे म्हणाले. तर महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी पुढील तीन महिने शेतकऱ्याला मदत करणे शक्य नसल्याचे स्पष्ट सांगितले आहे.

राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी औरंगाबाद जिल्ह्यात कन्नड तालुक्यातील नागद, सायगव्हान येथे शेतकऱ्यांच्या शेतात प्रत्यक्ष नुकसानीची पाहणी केली. येत्या आठ दिवसात शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. सध्या त्यांच्याकडे अतिवृष्टीमुळे किती नुकसान झाली याची आकडेवारी नाही. मात्र येत्या आठ दिवसात ही आकडेवारी आमच्याकडे येईल आणि त्यानंतर आम्ही मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांना मदत करण्यासंदर्भात बोलू. सध्याची कोरोनाची स्थिती लक्षात घेता शेतकऱ्यांना तात्काळ मदत करता येईल अशी परिस्थिती नाही. शासनाच्या तिजोरीत सध्या पैसा नाही, ही वस्तुस्थिती आहे, असे भुसे म्हणाले

दुसरीकडे राज्याचे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी देखील सोयगाव तालुक्यातील काही गावांच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकऱ्यांनी नुकसानीच्या व्यथा सत्तार यांच्या समोर मांडल्या. यावेळी एबीपी माझाशी बोलताना मंत्री सत्तार यांनी देखील स्पष्ट म्हटलं आहे की की सरकार कडे पैसा नाही सर्व पैसा कोरोना उपचारांसाठी लावला आहे. पुढील तीन महिने तरी हा पैसा उभा करणं शक्य नाही. पण शेतकऱ्यांना उद्धव ठाकरे वार्‍यावर सोडणार नाही वेळ प्रसंगी कर्ज काढून शेतकऱ्यांना मदत करू, असंही सत्तार म्हणाले. यावेळी सत्तार यांनी दावा केला की सोयगाव तालुक्यामध्ये पंचनाम्याला सुरुवात झाली आहे. मात्र ज्या शेतांमध्ये सत्तार नुकसानीची पाहणी करत होते.

state government अतिवृष्टी heavy rainfall पिकांचे नुकसान crop damage कृषी मंत्री दादाजी भुसे Agriculture Minister Dadaji Bhuse
English Summary: The government has no money to compensate for crop losses due to heavy rains

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय
CopyRight - 2020 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.