News

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी मध्यंतरी सरकारचं श्राद्ध आंदोलन घातलं होतं. आता या श्राद्ध आंदोलनापुढे सरकार झुकलं असून शेतकऱ्यांचा हरभरा खरेदीसाठी सरकारनं परवानगी दिलीये.

Updated on 29 April, 2023 2:19 PM IST

बारसू पेटले: 'प्रदूषणकारी प्रकल्प आम्हाला नकोच', शेतकरी आपल्या भूमिकेवर ठाम

१. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर बारसू परिसरात गेल्या काही दिवसांपासून वातावरण चांगलंच तापले आहे. या परिसरातील महिला, ग्रामस्थ, तसेच शेतकरी वर्गाने आक्रमक भूमिका घेत कोणत्याही परिस्थितीत आम्ही सर्वेक्षण बंद पडणारच अशी ठाम भूमिका हाती घेतलीये. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मंत्री उदय सामंत यांनी शेतकऱ्यांना विनंती करत बैठक घेऊन प्रश्न सोडवू अशी विनंती केली आहे.

शेतकऱ्यांनी चर्चेसाठी यावं, आम्ही चर्चेसाठी तयार आहोत, आम्हाला जबरदस्ती करायची नसल्याचं सरकारकडून मंत्री उदय सामंत यांनी शेतकऱ्यांना सांगितलं आहे. मात्र या प्रदूषणकारी प्रकल्पासाठी शेतकऱ्यांनी पूर्णपणे नकार दर्शवला आहे. मंत्री उद्या सामंत यांची विनंती धुडकावून लावत प्रदूषणकारी प्रकल्प आम्हाला नकोच, म्हणत शेतकरी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. प्रतीक पाटील यांनी त्यांच्या सोशल मीडियावरून हा व्हिडीओ शेयर केला आहे.

बारसू घटनेचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांचा तीव्र निषेद

२. बारसू सोलगाव रिफायनरी आंदोलनासाठी जाणारे स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष जालंदर पाटील व जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील यांना राजापूर पोलिसांनी अटक केलीये. या संपूर्ण घटनेचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी तीव्र निषेद केला आहे.

प्रशांत डिक्कर यांच्या श्राद्ध आंदोलनापुढं सरकार झुकलं, हरभरा खरेदीसाठी सरकारनं परवानगी दिली

३. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी मध्यंतरी सरकारचं श्राद्ध आंदोलन घातलं होतं. आता या श्राद्ध आंदोलनापुढे सरकार झुकलं असून शेतकऱ्यांचा हरभरा खरेदीसाठी सरकारनं परवानगी दिलीये. राज्यातुन बुलढाणा जिल्ह्यासाठी अतिरिक्त सर्वाधिक उद्दिष्ट १ लाख ४७ हजार क्विंटल हरभरा खरेदी होणार असल्याची माहिती प्रशांत डिक्कर यांनी दिली आहे. शिवाय सरकारने शेवटच्या दाण्यापर्यंत शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी करावा यासाठी संघर्ष करत राहू असं वक्तव्य देखील त्यांनी यावेळी केलंय.

राज्यात अवकाळीच संकट, शेतमाल भिजल्याने लाखोंचं नुकसान
४. सध्या राज्यभरात अवकाळीने शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं आहे. शेतातील उभे पीक आडवे झालं आहे. तर काही शेतकऱ्यांनी या नैसर्गिक संकटावर मात करत आपला माल बाजारपेठेपर्यंत पोहचवला मात्र अवकाळीच संकट शेतकऱ्यांची पाठ सोडायला काही तयार नाही. अक्षरशः शेतकऱ्यांची वर्षभराची मेहनत, पैसा सगळं काही या पावसात वाहून गेलंय. त्यामुळे सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत करावी अशी मागणी केली जात आहे.

बीड तालुक्यात मुसळधार पावसाची हजेरी, आमदार संदीप क्षीरसागर यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी

५. बीड तालुक्यात देखील मुसळधार पावसाने हजेरी लावली. यात पशुपालांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. या नुकसानग्रस्त भागाची बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी पाहणी केली आहे. तसेच गावातील काही शेतकरी, पशुपालक बांधवांशी चर्चा करत त्यांना धीर दिला. तातडीने प्रशासनास पंचनामे करण्याबाबत सूचित केले असल्याचं त्यांनी सांगितलं. शिवाय शेतकऱ्यांना ठोस नुकसान भरपाई मिळणे आवश्यक असून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिली.

भारतीय पशुवैद्यकीय दिवसानिमित्त दिल्ली येथे खास कार्यक्रमाचे आयोजन, केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री परुषोत्तम रुपाला यांची प्रमुख उपस्थिती

६. आज २९ एप्रिल. आज जगभरात जागतिक पशुवैदयकीय दिवस साजरा केला जातो. याचं दिवसाच्या निमित्त दिल्ली येथे प्रॅक्टिशनरसाठी भारतीय पशुवैद्यकीय परिषद नोंदणीचे उदघाटन झाले. केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांच्या हस्ते हा उदघाटन समारंभ पार पडला. खासदार डॉ. संजीव बालियान आणि केंद्रीय मंत्री एल मुरुगन यांची देखील प्रमुख उपस्थिती होती.

अधिक बातम्या:
शेतमाल तारण कर्ज योजना; शेतकऱ्यांना ठरतेय वरदान
पेरणी यंत्र योजनाद्वारे मिळणार तब्बल "एवढे" अनुदान, असा घ्या लाभ..
जांभळाला किलोला मिळाला ६०० ते ७०० रुपयांचा दर, मागणी वाढली..

English Summary: The government bowed to Prashant Dikkar's Shraddha movement; Govt gave permission to buy gram
Published on: 29 April 2023, 02:19 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)