News

कृषीमंत्री नरेंद्र तोमर यांनी शेतकऱ्यांना डाळी व तेलबिया यांचे उच्च उत्पादन देणारे बियाणे वाटप करण्यासाठी ‘मिनीकीट’ कार्यक्रम सुरू केला.ही मिनी किट राष्ट्रीय बियाणे महामंडळ (एनसीएस), नाफेड आणि गुजरात राज्य बियाणे कॉर्पोरेशन यासारख्या राष्ट्रीय संस्थांकडून पुरविली जात आहेत आणि केंद्र सरकार त्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा मिशनच्या माध्यमातून पूर्णपणे वित्तपुरवठा करीत आहे.

Updated on 03 June, 2021 6:54 PM IST

कृषीमंत्री नरेंद्र तोमर यांनी शेतकऱ्यांना डाळी(seeds) व तेलबिया यांचे उच्च उत्पादन देणारे बियाणे वाटप करण्यासाठी ‘मिनीकीट’ कार्यक्रम सुरू केला.ही मिनी किट राष्ट्रीय बियाणे महामंडळ (एनसीएस), नाफेड आणि गुजरात राज्य बियाणे कॉर्पोरेशन यासारख्या राष्ट्रीय संस्थांकडून पुरविली जात आहेत आणि केंद्र सरकार त्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा मिशनच्या माध्यमातून पूर्णपणे वित्तपुरवठा करीत आहे.

डाळ व तेलबियांचे उत्पादन वाढविणे :

बियाणे 'मिनी किट' कार्यक्रमाची सुरुवात कृषीमंत्री नरेंद्र तोमर यांच्या हस्ते झाली शेतकऱ्यांना डाळी व तेलबिया यांचे उच्च उत्पादन देणारे बियाणे वाटप करण्यात आली. तोमर म्हणाले की, केंद्र सरकार राज्यांच्या सहकार्याने डाळ व तेलबियांचे उत्पादन आणि उत्पादकता वाढविण्यासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविते या मागचा हेतू हा आहे शेतकऱ्यांना चांगले बियाणे मिळावे जेणेकरून उत्पादन वाढविण्यास मदत मिळेल.

हेही वाचा:देशातील फळे निर्यातीमधील राज्याचे प्रथम स्थान अधिक मजबूत करा – संदिपान भुमरे


वितरण 15 जून 2021 पर्यंत सुरू राहील:

मिनी किट कार्यक्रमांतर्गत बियाणे वाटप 15 जून 2021 पर्यंत सुरू राहील जेणेकरून खरीप पिकांच्या पेरणीपूर्वी शेतकऱ्यांना बियाणे मिळतील. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत डाळींच्या एकूण 20,27,318 मिनी किट, सोयाबीनच्या आठ लाखाहून अधिक मिनी किट आणि शेंगदाण्याच्या 74,000 मिनी किट्स शेतकऱ्यांना विनाशुल्क देण्यात येतील.

कृषी मंत्रालयाने म्हटले आहे की 2014-15 पासून डाळी व तेलबियांचे उत्पादन वाढविण्यावर नव्याने लक्ष दिले जात आहे. याच काळात डाळीचे उत्पादन 17.15 दशलक्ष टनांवरून 25.56 दशलक्ष टनांपर्यंत वाढले आहे.आणि आता यात मोठ्याने वाढ होत आहे . तेलबियाचे उत्पादन 27.51 वरून 36.57
दशलक्ष टन वाढले.

English Summary: The good news for farmers is that seeds will now be available for free till June 15
Published on: 03 June 2021, 06:54 IST