News

नवी दिल्ली: सोमवारी हाजिर बाजारात मागणी वाढल्याने सोयाबीनच्या भावात ३० रुपयांनी वाढून ३ हजार ७३८ रुपये क्किंटल झाला. नॅशनल कमोडिटी एक्सचेंज आणि डेरिवेटिव्ह एक्सचेंजमध्ये सोयाबीन मार्चच्या डिलीवरी कराराचा भाव ३० रुपयांनी म्हणजेच ०.८१ टक्क्यांनी वाढत ३ हजार ७३८ रुपये क्विंटल वर पोहोचला. करारानुसार ९५ हजार ८४५ च्या लॉटसाठी सौदे करण्यात आला.

Updated on 03 March, 2020 8:42 AM IST


नवी दिल्ली:
सोमवारी हाजिर बाजारात मागणी वाढल्याने सोयाबीनच्या भावात ३० रुपयांनी वाढून ३ हजार ७३८ रुपये क्किंटल झाला. नॅशनल कमोडिटी एक्सचेंज आणि डेरिवेटिव्ह एक्सचेंजमध्ये सोयाबीन मार्चच्या डिलीवरी कराराचा भाव ३० रुपयांनी म्हणजेच ०.८१ टक्क्यांनी वाढत ३ हजार ७३८ रुपये क्विंटल वर पोहोचला. या करारनुसार ९५ हजार ८४५ च्या लॉटसाठी सौदे करण्यात आला.

याचप्रकारे एप्रिलच्या सोयाबीन डिलीवरीचा भाव पण इतकाच वाढत ३ हजार ७१२ रुपये क्विंटल झाला. यात १ लाख १३ हजार ५० च्या लॉटसाठी सौदा झाला. बाजारात मागणी वाढल्याने दलालांनी नवीन सौदे केले. यामुळे बाजार मजबूत स्थितीत होता. स्थानिक वायदा बाजारात मोहरीच्या बिजांचा भाव ७ रुपयांनी वाढून ४ हजार रुपये प्रति क्किंटल झाला. सुत्रांच्या माहितीनुसार पुरवठा कमी पडल्याने आणि हाजिर बाजारात ऑईल मिलकडून मागणी वाढल्याने मोहरीच्या भाव वाढ झाली.

एनसीडीईएक्समध्ये मोहरीचे दाने एप्रिल डिलिवरीचा भाव सात रुपये म्हणजेच ०.१८ टक्क्यांनी वाढत ४ हजार रुपये क्विंटलवर पोहोचला. या करारात १७ हजार ३४० च्या लॉटला पसंती राहिली. याच प्रकारे मे डिलीवरीसाठी वायदा भाव दोन रुपयांनी म्हणजेच ०.०५ टक्क्यांनी वाढत ४,०३० रुपये क्किंटल राहिला. या करारात ४ हजार ५५० लॉटसाठी सौदे झाले. हाजिर बाजारात गवार बिजांची किंमती ५० रुपयांनी वाढलेल्या दिसल्या. नॅशनल कमोडिटी आणि डेरिवेटिव्स एक्सचेंज मधील करारात गवार बिजांची किंमत ५० रुपयांनी म्हणजे १.३७ रुपये प्रति १० क्किंटल झाली. ज्यात ४६ हजार ४१० लॉटसाठी व्यापार झाला. 

 

English Summary: The futures market is headed by mustard guar and soybean speed up in new deals
Published on: 03 March 2020, 08:36 IST