News

खरीप हंगामात कडधान्ये वर्गीय पिकांमध्ये मूग आणि उडीद ही प्रमुख पिके आहेत. बरेच शेतकरी मोठ्या प्रमाणात मूग आणि उडीदाचे लागवड करतात तसेच आंतरपीक म्हणून देखील मूग आणि उडीद लागवड करण्यात येते. जर आपण खानदेश आणि विदर्भ इत्यादी ठिकाणचा विचार केला तर कपाशी मध्ये आंतरपीक म्हणून मूग आणि उडीदाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते.

Updated on 12 August, 2022 2:03 PM IST

खरीप हंगामात कडधान्ये वर्गीय पिकांमध्ये मूग आणि उडीद ही प्रमुख पिके आहेत. बरेच शेतकरी मोठ्या प्रमाणात मूग आणि उडीदाचे लागवड करतात तसेच आंतरपीक म्हणून देखील मूग आणि उडीद लागवड करण्यात येते. जर आपण खानदेश आणि विदर्भ इत्यादी ठिकाणचा विचार केला तर कपाशी मध्ये आंतरपीक म्हणून मूग आणि उडीदाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते.

सध्या मुग तोडणी वर असून बाजारपेठेत देखील त्याला चांगला भाव मिळताना  दिसून येत आहे. या लेखामध्ये आपण मूग आणि उडीद यांची सध्याची बाजारपेठेतील स्थिती काय आहे याबद्दल माहिती घेऊ.

नक्की वाचा:काय म्हणता! सिमला मिरचीच्या लागवडीसाठी 'हे' राज्य सरकार देते चक्क इतके अनुदान, वाचा महत्त्वाची माहिती

 मुगाची बाजारपेठेतील स्थिती

 आता संपूर्ण देशाचा विचार केला तर नवीन मुगाचे बाजारपेठेमध्ये चांगल्यापैकी आवक होत असून राज्यातील सातारा आणि जालना  बाजारपेठेमध्ये देखील मूग विक्रीसाठी येत असल्याचे व्यापाऱ्यांनी म्हटले आहे.

जुलैमहिन्यात झालेल्या पावसामुळे मुग उत्पादनात घट येण्याची शक्यता असून दरात सुधारणा झाली आहे. जर मंगळवारचा विचार केला तर सरासरी देशात सात हजार 700 रुपयांपर्यंत मुगाचा भाव होता.

लातूर बाजार समिती मध्ये सात हजार 600 रुपयांनी लिलाव झाले तर जळगाव बाजार समितीत आठ हजार दोनशे रुपये पर्यंत विकला गेला.

नक्की वाचा:Flower Farming: 'या' फुलांची शेती करून घ्या चांगली कमाई; जाणून घ्या सविस्तर

 उडीदाची बाजारपेठिय स्थिती

 सध्याच्या केंद्र सरकारच्या आकडेवारीचा विचार केला तर संपूर्ण देशामध्ये उडदाच्या लागवडीत घट आली असून यातील मध्यप्रदेश सारख्या राज्यांमध्ये उडीद पिकाला पावसाचा फटका बसला आहे. महाराष्ट्रात देखील पावसामुळे उडदाचे नुकसान झाले असून मागील आठवड्यात देशातील बाजारपेठेत उडीद तेजीत होता.

जर आपण देशातील काही बाजार समित्यांचा विचार केला तर सरासरी आठ हजार तीनशे रुपयांपर्यंत भाव उडीदला मिळाला.

महाराष्ट्रमध्ये अजूनपर्यंत हव्या त्या प्रमाणात उडीदाची आवक सुरू झाली नसून सरासरी दर आठ हजार दोनशे रुपयांपर्यंत आहे. जर आपण उडदाच्या हमीभावाचा विचार केला तर आता मिळणारा दर हा त्याच्यापेक्षा जवळजवळ एक-दीड हजार रुपयांनी जास्त आहे.

नक्की वाचा:मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प, पुणे प्रकल्पाकरिता वैयक्तिक माहितीसह अर्ज मागविण्यात येत आहेत

English Summary: the fresh market rate update of green gram and black gram in country
Published on: 12 August 2022, 02:03 IST