गेल्या काही दिवसांपासून राज्यात शेतकऱ्यांची वीज तोडली जात आहे, यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. असे असताना आता शेतकरी आक्रमक झाले आहेत. यामुळे आता शेतकरी आंदोलन करणार आहेत. कराडमध्ये शेतकरी संघटनेकडून आंदोलन करण्यात येणार आहे. वीज वितरण विरोधात सर्व शेतकरी संघटना एकवटल्या असून शुक्रवार दि. 28 रोजी विविध मागण्यांसाठी वीज वितरणच्या कराड शहर कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे, यामुळे येणाऱ्या काळात हे आंदोलन अधिकच तीव्र होण्याची शक्यता आहे. शेतकरी सरकारला जाब विचारणार आहेत.
बळीराजा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष पंजाबराव पाटील, शेती मित्र अशोकराव थोरात, स्वाभिमीनी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवानंद पाटील तसेच यावेळी अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचे सांगितले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे सध्या मोठे नुकसान होत आहे. शेती पंपांना मोफत वीज द्या व थकीत बिलापोटी शेती पंपाची तोडलेली वीज तात्काळ जोडण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे.
चुकीच्या पध्दतीने शेतकऱ्यांकडून वीज आकारणी केली जात आहे. शेतकऱ्यांना कर्नाटक, तेलंगणा या प्रमाणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोफत वीज दिली पाहिजे. राज्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सकारात्मकता दाखवली पाहिजे, असे यावेळी अशोकराव थोरात यांनी म्हटले आहे. येणाऱ्या काळात वीज जोडली नाहीतर मोठे आंदोलन केले जाईल, असेही ते म्हणाले. उद्योगांना दिवसा वीज आणि शेतकऱ्यांना रात्री. शिवारात बिबटे, साप, विंचू यांचा धोका असताना शेतकरी दिवसभर काबाडकष्ट करून शेतीला पाणी देण्यासाठी रात्री दोन वाजता शेतात जाणार हा शेतकऱ्यांवर अन्याय करणार आहे. यामुळे शेकऱ्यांवर सध्या मोठ्या प्रमाणावर अन्याय सुरु आहे.
वीज वितरणची शेतकऱ्यांबाबतची धोरणे अत्यंत अन्यायकारक व चुकीची आहेत. उद्योगांची लोखो रूपयांची वीज बिले थकीत असताना कारवाईचा बडगा मात्र शेतकऱ्यांवर उगारला जातो, असे यावेळी पंजाबराव पाटील यांनी म्हटले आहे. यामुळे या आंदोलनानंतर तरी प्रशासन जागेवर येणार का हे येणाऱ्या काळातच समजेल. यामुळे मात्र अनेक शेतकऱ्यांची उभी पिके जळून गेली आहेत, अनेक शेतकऱ्यांचे ऊस तोडणीला आले होते. मात्र पाणी न दिल्याने आता वजनात मोठी घट होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे.
Published on: 22 January 2022, 03:32 IST