कोकणातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. पुढील महिन्यातील पहिल्या आठवड्यात कोकणात पहिल्यांदाच कृषी प्रदर्शनाचा (Agricultural Exhibition) शुभारंभ बघायला मिळणार आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, कोकणातील (Konkan) वाडा तालुक्यातील पालसई येथे कोकणाचे पहिले कृषी प्रदर्शन (Konkan's first agricultural exhibition) आयोजित केले जाणार आहे. हे कृषी प्रदर्शन 5 ते 6 मे या दोन दिवशी भरवले जाणार आहे. या कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री माननीय नितीन गडकरी (Union Minister Hon'ble Nitin Gadkari) यांच्या हस्ते होणार आहे.
कृषी प्रदर्शनासाठी आवश्यक सर्व तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. मोठ्या दिमाखात कृषी प्रदर्शनाचे आयोजन कोकणात होणार असल्याचे सांगितले जात आहे. या कृषी प्रदर्शनात देशभरातील जवळपास शंभर कृषी कंपन्या सहभाग नोंदवणार असल्याचे सांगितले गेले आहे. या कंपन्या नवीन उत्पादने आणि नवीन तंत्रज्ञान शेतकरी बांधवांसाठी सादर करतील अशी आशा आहे.
हेही वाचा:-मराठवाड्यावर दुष्काळात तेरावा महिना! आता शेतकऱ्यांनी करायचे तरी काय?
मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, शेती आता संपूर्ण हायटेक बनत चालली आहे. यामुळे शेतकरी बांधवांना नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती असणे अनिवार्य झाले आहे. यामुळे या कृषी प्रदर्शनात नवनवीन तंत्रज्ञान व आधुनिक विचार शेतकऱ्यांपर्यंत पोचवले जाणार आहेत.
या कृषी प्रदर्शनाचे हेच एक प्रमुख उद्दिष्ट आहे. विशेष म्हणजे या कृषी प्रदर्शनाचे आयोजन एका सहकारी संस्थेने केले आहे. वाडा झिनिया कोलम उत्पादक नामक एका सहकारी संस्थेने या भव्य कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले जातं आहे. कृषी व्हेज सिड यांनी निर्माण केलेल्या 125 बियाणांची लागवड देखील यावेळी कृषी प्रदर्शनात बघायला मिळणार आहे. यामुळे निश्चितच शेतकरी बांधवांना नवनवीन तंत्रज्ञानाचा तसेच नवनवीन पिकांची माहिती जाणून घेता येणार आहे.
हेही वाचा:-शेतकऱ्यांनो आपत्कालीन पीक नियोजन ठरतय फायदेशीर, वाचा संपूर्ण माहिती..
मित्रांनो वाडा हा तालुका तांदूळ उत्पादनासाठी विशेष ओळखला जातो. तांदूळ उत्पादनाच्या बाबतीत वाडा हा तालुका जगात प्रसिद्ध आहे. वाडा तालुक्यातील शेतकऱ्यांना नवनवीन उपकरणांची तसेच यंत्रांची माहीती घेण्यासाठी तसेच पाहणी करण्यासाठी यापूर्वी पुणे-नाशिक सारख्या सिटीकडे धाव घ्यावी लागेल. यामुळे अनेक लोकांना शेती क्षेत्रात उपयोगी पडणारे नवनवीन यंत्रांची माहिती मिळत नसे.
यामुळे वाडा येथे आयोजित केले जाणारे हे कृषी प्रदर्शन तालुक्यातील शेतकऱ्यांना तसेच पंचक्रोशीतील याशिवाय पालघर ठाणे जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना उपयोगी पडणारे आहे. 5 मे रोजी या कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. तसेच यावेळी केंद्रातील व राज्यातील अनेक मंत्री उपस्थित राहणार असल्याचे आयोजकांकडून सांगितले गेले आहे. एकंदरीत मान्यवरांच्या उपस्थितीत हे कृषी प्रदर्शन मोठ्या दिमाखात साजरा होणार आहे.
हेही वाचा:-शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी सांगितले महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचे खरे कारण, म्हणाले शरद पवार..
Published on: 24 April 2022, 02:35 IST