News

ट्रॅक्टरने शेती मशागत आर्थिकदृष्ट्या परवडणारी नाही आणि बैलांना पोसणेदेखील जमत नाही. अशा स्थितीत वाशिम तालुक्यातील भाऊराव धनगर नामक शेतकऱ्याने चक्क राजा आणि तुळशा अशी नावे असलेल्या दोन प्रशिक्षित घोड्यांना औताला जुंपून शेत मशागत केली आहे.

Updated on 04 April, 2022 2:35 PM IST

वाशिम : ट्रॅक्टरने शेती मशागत आर्थिकदृष्ट्या परवडणारी नाही आणि बैलांना पोसणेदेखील जमत नाही. अशा स्थितीत वाशीम तालुक्यातील शेलगाव येथील भाऊराव धनगर नामक शेतकऱ्याने चक्क राजा आणि तुळशा अशी नावे असलेल्या दोन प्रशिक्षित घोड्यांना औताला जुंपून शेत मशागत केली आहे.

दोन्ही घोड्यांना शेती मशागती संबंधीचे प्रशिक्षण देण्यात आले. ट्रॅक्टर किंवा बैलांऐवजी शेतकरी भाऊराव धनगर यांनी आपल्या घोड्यांव्दारेच शेती मशागतीचे काम सुरू केले. ते गतीने पूर्ण होत असल्याची माहिती त्यांनी दिली.

विशेष म्हणजे घोड्यावर बसून शेतात ये-जा करणे, थोड्याथोडक्या शेतीपयोगी साहित्यांची घोड्यावरच ने-आण करणे शक्य असल्याने कामे सुसह्य झाली आहेत, असा अनुभव शेतकरी भाऊराव धनगर यांनी सांगितला. गावापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या शेतात ये-जा करण्यासाठी घोड्यांचा वापर केला जातो.

महत्त्वाच्या बातम्या :
मोठी बातमी : बनावट शेतीमालाची विक्री केल्यास आता जेलची हवा खावी लागणार
एप्रिल महिन्यात 'या' भाज्यांची लागवड करून कमवा लाखोंचा नफा..!

लग्नाच्या वरातीमध्ये घोडे नाचविण्यातून काही प्रमाणात आर्थिक मिळकत होऊ शकते . या उद्देशाने धनगर यांनी दोन्ही घोड्यांना तसे प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न केला, मात्र घोडे काही नाचले नाही. शेवटी त्यांनी शेती मशागतीच्या कामासाठी घोड्यांचा वापर करणे सुरू केले असून त्यात ते पूर्णतः यशस्वी झाले आहेत.

भाऊरावांनी मुलाच्या हट्टापायी काही वर्षांपूर्वी एक लहानसा घोडा खरेदी केला होता. कालांतराने तो मोठा झाला. त्याच्या जोडीला आणखी एक घोडा असावा म्हणून त्यांनी दुसरा एक घोडा खरेदी केला. या दोघांची नावे राजा आणि तुळशी अशी ठेवण्यात आली आहेत.

महत्त्वाच्या बातम्या :
तापमानवाढीमुळे जीव गुदमरतोय; घरात लावा 'ही' झाडे आणि मिळवा थंड हवा

English Summary: The farmer's voice is heard; Horses were harnessed, plowing was completed
Published on: 04 April 2022, 02:35 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)