News

सध्या देशातील शेतकऱ्यांचे लक्ष हे केंद्रीय अर्थसंकल्पाकडे लागले आहे. यामधून शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा होणार असल्याची चर्चा सध्या रंगली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या 1 फेब्रुवारीला देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. देशात कोरोना तसेच नैसर्गिक आपत्ती यामुळे देशातील शेतकरी पूर्णपणे कोलमडला आहे.

Updated on 25 January, 2022 11:21 AM IST

नवी दिल्ली, सध्या देशातील शेतकऱ्यांचे लक्ष हे केंद्रीय अर्थसंकल्पाकडे लागले आहे. यामधून शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा होणार असल्याची चर्चा सध्या रंगली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या 1 फेब्रुवारीला देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. देशात कोरोना तसेच नैसर्गिक आपत्ती यामुळे देशातील शेतकरी पूर्णपणे कोलमडला आहे. यामुळे आता शेतकऱ्याला पुन्हा एकदा त्याच्या पायावर उभे करणे गरजेचे आहे. यासाठी मोठी तरतूद करावी लागणार आहे. भारतात छोट्या शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक असून त्यांना वेळेवर आणि सुलभरित्या कर्ज मिळावा यासाठी सरकार प्रयत्न करण्याची शक्यता आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांवर गेल्या काही दिवसांपासून वाईट दिवस आले आहेत. यामुळे त्यांना मोदी सरकारकडून मोठ्या अपेक्षा आहेत.

तसेच या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना कमी व्याज दरावर कर्ज, शेती क्षेत्रासाठी नवतंत्रज्ञान, कृषी पायाभूत सुविधा, वेगवेगळी पिके, यूरिया वरील अवलंबित्व कमी करणे या सारख्या मुद्द्यावर निर्णय होईल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. शेतीसंबंधित सर्व खते देखील महाग झाल्याने शेती करणे परवडत नाही. यामुळे खतांच्या किमती देखील कमी करण्याची मागणी शेतकरी करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा अनेकदा केली, मात्र त्यावर पुढे काही झाले नाही. त्यातच गेल्या दोन वर्षांपासून आलेल्या कोरोनामुळे शेतकऱ्यांच्या मालाला बाजारभाव देखील मिळत नाही.

शेतकऱ्यांसाठी नव्या तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार पावले उचलण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. ठिबक सिंचन आणि लिफ्ट इरिगेशन यासारख्या सुविधांवर सरकार भर देऊन सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी प्रयत्न करू शकते. कृषी कायद्यांमुळे उत्तर भारतातील शेतकरी नाराज आहे, यामुळे त्यांचे मन वळवण्यासाठी आता मोठे निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यातच पंजाब उत्तर प्रदेश या मोठ्या आणि महत्वाच्या राज्यात निवडणूक होत आहेत, यामुळे मोदी सरकार अनेक मोठे निर्णय घेऊ शकते. तसेच सध्या पेरणीपूर्वी आणि पिकं काढल्यानंतर त्याची विक्री करण्यासाठी पायाभूत सुविधांची स्थिती चांगली नाही.

मोबाईल माती परिक्षण, शीतगृह, वाहतूक आणि गोदाम यासाठी देखील सरकार मोठ्या तरतुदी करु शकते. यामुळे अर्थसंकल्पात छोट्या शेतकऱ्यांसाठी कर्जाची सुविधा आणखी योग्य बनवण्यासाठी सरकार लक्ष देण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे शेतकरी याकडे लक्ष देऊन आहेत. गेल्या काही दिवसांपासून कृषी क्षेत्रात मोठे बदल होत आहेत, मात्र शेतकऱ्यांची परिस्थिती आहे अशीच आहे. यामध्ये बदल होण्याचे गरज आहे. अनेक शेतकरी आत्महत्या करत आहेत. यामुळे शेतकरी हिताचे निर्णय घेणे गरजेचे आहे.

English Summary: The farmer's self-reliance? The big announcement will make Modi government. (1)
Published on: 25 January 2022, 11:21 IST