शेतकऱ्यांच्या मुली आज प्रत्येक क्षेत्रात आघाडी घेताना पाहायला मिळत आहेत. ग्रामीण भागातील मुली आज पुढे जात आहेत. शेतकऱ्याची लेक अधिकारी झाली ही कौतुस्कास्पद बातमी आहे. पंढरपूर तालुक्यातील आंबे गावातील स्वप्नाली अज्ञान गायकवाड हिची मृदा व जलसंधारण विभागात उपविभागीय अधिकारी या पदावर निवड झाली आहे.
स्वप्नाली अज्ञान गायकवाड हिने एमपीएससी परीक्षेत महिला प्रवर्गातून नववा, तर ईडब्लूएस या महिला प्रवर्गातून दुसरा क्रमांक पटकावला आहे. दुसऱया प्रयत्नात तिला यश आले आणि तिने उपविभागीय अधिकारीपदी गवसणी घातली आहे.
कृषी यांत्रिकीकरणाला चालना देण्यासाठी आता कृषी यंत्रावर मिळणार अनुदान
स्वप्नाली गायकवाडचे आई - वडील सर्व सामान्य शेतकरी आहेत. मुलीने मोठय़ा जिद्दीने आपल्या कष्टाचे चीज केले. त्यामुळे मोठा अभिमान वाटत असल्याची भावना हिचे वडील अज्ञान गायकवाड यांनी व्यक्त केली आहे. इंजिनीअरिंगचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिने स्पर्धा परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. यासाठी तिला प्रशासकीय सेवेत असलेला मोठा भाऊ सचिन याचे प्रोत्साहन मिळाले.
वीज तुटवडा भरून काढण्यासाठी राज्य सरकारची धडपड; ऊर्जामंत्र्यांचा छत्तीसगढ दौरा
Published on: 21 April 2022, 03:52 IST