News

7 मार्च 2013 रोजी साडेसात एचपीचे कनेक्शन घेतले होते. यासाठी त्यांनी सात हजार सातशे रुपये कोटेशन म्हणून महावितरणकडे जमा देखील केलेत. यानंतर मात्र अडीच वर्षात त्यांना तब्बल 99 लाख रुपये वीजबिल आले होते. त्यावेळेस सुमाकांत यांनी महावितरणचे कार्यालय गाठले आणि अधिक वीज बिल संदर्भात महावितरणकडे तक्रार नोंदवली त्यावेळी महावितरणने सुमाकांत यांचे वीजबिल जमा करून घेतलं. यानंतर सुमाकांत यांना 2019 मध्ये 1 कोटी 18 लाख 38 हजार 790 रुपये रकमेचे बिल आले होते. आता पुन्हा एकदा महावितरणने या गरीब शेतकऱ्याला मोठा शॉक दिला असून 2022 मध्ये 33 लाखांचे विज बिल पाठवले आणि थकीत वीज बिलामुळे वीज पुरवठा खंडित केला.

Updated on 19 March, 2022 2:13 PM IST

पुणे जिल्ह्यात महावितरणचा गलथान कारभार उघडकीस आला आहे. महावितरणने जिल्ह्यातील एका शेतकऱ्यास तब्बल 33 लाख रुपये शेतपंपाचे बिल पाठवले आहे, यामुळे शेतकऱ्याची रातों की निंद हराम झाली आहे. जिल्ह्यातील खेड तालुक्याच्या मौजे सायगाव येथील सुमाकांत पंढरीनाथ काळे या शेतकऱ्यासोबत ही घटना घडली आहे.

पंढरीनाथ यांना फेब्रुवारी महिन्यात 33 लाख 38 हजार 690 रुपयांचे विज बिल आले आहे. याआधी देखील या शेतकऱ्याला कोट्यावधी रुपयाची बिले आली आहेत. विशेष म्हणजे सदरील शेतकऱ्याकडे राज्यातील सर्वात जास्त थकबाकी असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे. महावितरणच्या या गलथान कारभारामुळे शेतकरी सुमाकांत पंढरीनाथ काळे मोठ्या संकटात सापडले आहेत.

मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, 7 मार्च 2013 रोजी साडेसात एचपीचे कनेक्शन घेतले होते. यासाठी त्यांनी सात हजार सातशे रुपये कोटेशन म्हणून महावितरणकडे जमा देखील केलेत. यानंतर मात्र अडीच वर्षात त्यांना तब्बल 99 लाख रुपये वीजबिल आले होते.

त्यावेळेस सुमाकांत यांनी महावितरणचे कार्यालय गाठले आणि अधिक वीज बिल संदर्भात महावितरणकडे तक्रार नोंदवली त्यावेळी महावितरणने सुमाकांत यांचे वीजबिल जमा करून घेतलं. यानंतर सुमाकांत यांना 2019 मध्ये 1 कोटी 18 लाख 38 हजार 790 रुपये रकमेचे बिल आले होते.

आता पुन्हा एकदा महावितरणने या गरीब शेतकऱ्याला मोठा शॉक दिला असून 2022 मध्ये 33 लाखांचे विज बिल पाठवले आणि थकीत वीज बिलामुळे वीज पुरवठा खंडित केला. यानंतर सुमाकांत यांना 25 हजार रुपये भरले तेव्हा महावितरणने पुन्हा एकदा वीजपुरवठा सुरू केला.

मात्र महावितरण सुमाकांत यांचे वीजबिल कमी करण्याच्या मूडमध्ये नाही. यामुळेच सुमाकांत मोठ्या अडचणीत सापडले आहेत. महावितरणचा गलथान कारभार अनेकदा उघडकीस आला आहे मात्र हा महावितरणचा कारभार गलथान नसून निर्दयीपणाचा कळस गाठणारा आहे असे मत शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

संबंधित बातम्या:-

मक्याचा आडोसा घेऊन 'या' शेतकऱ्याने केलं असं काही विपरीत की पोलिसांनी टाकला छापा आणि……!

रस्त्याअभावी शेतकऱ्याचे लाखोंचं सोयाबीन वावरातचं कुजलं; असं काय विपरीत लातुरात घडलं…..!

कांद्याचा भाव तब्बल दीड हजारांनी घसरला! कांदा उत्पादक शेतकरी सापडला पुन्हा अडचणीत

English Summary: the farmers get 33 lakh rupees electricity bill the farmers get harrased
Published on: 19 March 2022, 02:13 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)