News

पीएम किसान सम्मान निधि योजना केंद्र सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. ही योजना केंद्र सरकारच्या निधीतून चालवण्यात येत आहे. या योजनेद्वारे देशातील सुमारे 11 कोटी शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये दिले जातात. पात्र शेतकर्‍यांना दोन हजार रुपयांची वार्षिक तीन हप्ते दिले जातात. राज्यातील सुमारे एक कोटी पाच लाख शेतकरी केंद्र शासनाच्या या महत्वाकांक्षी योजनेसाठी पात्र आहेत.

Updated on 28 January, 2022 9:43 AM IST

पीएम किसान सम्मान निधि योजना केंद्र सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. ही योजना केंद्र सरकारच्या निधीतून चालवण्यात येत आहे. या योजनेद्वारे देशातील सुमारे 11 कोटी शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये दिले जातात. पात्र शेतकर्‍यांना दोन हजार रुपयांची वार्षिक तीन हप्ते दिले जातात. राज्यातील सुमारे एक कोटी पाच लाख शेतकरी केंद्र शासनाच्या या महत्वाकांक्षी योजनेसाठी पात्र आहेत. 

पीएम किसान सन्मान निधी योजना साठी पात्र शेतकऱ्यांना नुकतेच नववर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच एक जानेवारीला या योजनेचा दहावा हप्ता माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या करकमलाद्वारे वितरित करण्यात आला. मात्र, असे असले तरी देशात अद्यापही असे अनेक शेतकरी आहेत जे की या योजनेसाठी पात्र असू शकतात मात्र त्यांनी अजून पर्यंत या योजनेसाठी आवेदन केलेले नाही. आपल्या राज्यात देखील असे अनेक शेतकरी असल्याचे सांगितले जात आहे. शेतकरी मित्रांनो जर आपणही या शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सुरू असलेल्या योजनेत अजून पर्यंत सहभागी झाला नसाल तर लवकरात लवकर या योजनेत सहभागी व्हा, शेतकरी मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की केंद्र सरकार या योजनेसाठी अकरावा हप्ता आगामी काही दिवसात पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार आहे. म्हणून जर आपण या योजनेत अजून सहभाग घेतला नसेल तर लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करून सहभाग घ्या आणि आगामी काही दिवसात मिळणाऱ्या अकराव्या हफ्त्याचा लाभ घ्या.

केव्हा येणार अकरावा हफ्ता

शेतकरी मित्रांनो देशातील सुमारे 11 कोटी शेतकऱ्यांना जानेवारीच्या पहिल्या दिवशी पी एम किसान चा दहावा हप्ता वितरित करण्यात आला आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक आर्थिक वर्षात पहिला हप्ता 1 एप्रिल 31 जुलै या दरम्यान मिळणे अपेक्षित असते. आर्थिक वर्षातील दुसरा हप्ता एक ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर या दरम्यान जमा केला जातो. आणि आर्थिक वर्षाचा शेवटचा अर्थात तिसरा हफ्ता 1 डिसेंबर ते 31 मार्च या दरम्यान जमा केला जातो.

या माहितीच्या आधारे येणाऱ्या आर्थिक वर्षातील पहिला हप्ता म्हणजे या योजनेचा अकरावा हफ्ता एप्रिल ते जुलै महिन्याच्या दरम्यान पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाऊ शकतो.

English Summary: The eleventh installment of PM Kisan Samman Nidhi Yojana will be credited on this date
Published on: 28 January 2022, 09:43 IST